SIP : मुलांचे भविष्य करायचे सुरक्षित, मग या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करेल चिंतामुक्त..

SIP : वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल..

SIP : मुलांचे भविष्य करायचे सुरक्षित, मग या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करेल चिंतामुक्त..
चिंता नाही फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 6:59 PM

नवी दिल्ली : वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे (Education Inflation) पालकांना (Parents) चिंता वाटणे सहाजिकच आहे. अभियांत्रिकी, डॉक्टर आणि अन्य अभ्यासक्रमाच्या खर्चाचे आकडे अनेकांना न झेपणारेच आहे. पण तरीही मुलांची स्वप्न साकार करण्यासाठी पालक शैक्षणिक कर्ज (Educational Loan) घेतात. पण दुसरे मार्ग चोखाळले तर काही वर्षांनी वाढणाऱ्या या खर्चाची तयारी तुम्ही योग्य गुंतवणुकीतून करु शकता.

भविष्यातील खर्चाची तरतूद करण्यासाठी तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. भविष्यातील आर्थिक खर्च भागविण्यासाठी म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. पण कोणत्या फंडात केलेली गुंतवणूक फायेदशीर ठरेल ते समजून घेऊयात..

नियोजन करताना मुलं लहान असतानाच अशी गुंतवणूक फायदेशी ठरते. म्युच्युअसल फंडात दीर्घकालीन केलेली गुंतवणूक मोठा निधी उभा करण्यास मदत करते. त्यामुळे मुलं लहान असतानाच कमाईचा काही भाग गुंतवणूक करणे लाभदायक ठरते.

हे सुद्धा वाचा

शैक्षणिक खर्च हा नेहमी दोन अंकी असतो, त्यामुळे गुंतवणूक करताना या गोष्टीचे भान ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पुढील 10 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर सरासरी 12-14 टक्के परतावा मिळू शकतो. त्यासाठी 80 टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात तर 20 टक्के गुंतवणूक डेट फंडात करणे फायद्याचे ठरते.

बाजारातील तज्ज्ञांनी काही म्युच्युअल फंडाची यादी दिली आहे. शैक्षणिक निधीसाठी या फंडात दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. ही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत नक्की करा.

DSP Equity Opp, Fund, HDFC Flexicap Fund, Kotak Emerging Equity Fund, SBI Focused Equity Fund, SBI Contra Fund, DSP World Mining Fund, Franklin Ind, Feeder-Frank US Opp, ABSL Money Manager Fund, UTI Money Market Fund या फंडात गुंतवणूक करता येईल.

या फंडामध्ये तुम्ही साधारणतः 5000 रुपयांची दरमहा केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्यासाठी SIP करावी लागेल. तुम्हाला 500 रुपयांपासूनही सुरुवात करता येते. तुमच्या गुंतवणुकीनुसार तुम्हाला परतावा मिळेल.

सध्या अनेक फंड 12 टक्के, 15 टक्के तर काही फंड 20 टक्क्यांपर्यंत परतावा देतात. तुमच्या गुंतवणुकीनुसार या फंडातून परतावा मिळेल. 5000 रुपयांच्या एसआयपीवर 10 वर्षांनी 14.45 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.