मुंबई : रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold price today) सातत्याने घसरण सुरू असल्याची पहायला मिळत आहे. तीन आठवड्यांपूर्वी 24 कॅरट सोन्याचे (Gold) दर हे प्रति तोळा 54 हजारांच्या सर्वोच्च किमतीवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरणीला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत सोन्याचे दर तोळ्यामागे तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र या घसरणीला आज ब्रेक लागला असून, सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 100 रुपये इतके होते. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 300 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51 हजार 710 रुपये एवढे आहेत. आज चांदीचे (silver) दर 62 हजार 500 रुपये किलो इतके आहेत. सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. त्यामुळे दरात काही प्रमाणात तफावत जाणू शकते.
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 400 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51 हजार 710 रुपये एवढे आहेत. उपराजधानी नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचे दर अनुक्रमे 47 हजार 550 व 51 हजार 860 रुपये इतके आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 550 असून 24 कॅरट सोन्याचे दर 51 हजार 860 रुपये इतके आहे. तर आज चांदीचा भाव प्रति किलो 62 हजार 500 रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सोन्याच्या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. मात्र सोने स्वस्त होत असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरू आहे. लगनसराईत सोन्याला मोठी मागणी असते. सध्या देशात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र तरी देखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर वाढत होते, म्हणून ज्यांनी गुंतवणूक केली, अशा गुंतवणूकदारांच्या चिंता आता वाढल्या आहेत.