Small Savings Schemes : वारस न नेमताच ओढावला खातेदाराचा मृत्यू, तर पैसे मिळतील कोणाला?

Small Savings Schemes : अल्प बचत योजनांमध्ये अनेक जण रक्कम गुंतवितात. या योजनांमध्ये जोखीम नसते. पण अनेक जण एक चूक हमखास करतात. या योजनेत ते वारसाचं नाव नोंदवत नाहीत. खातेदाराचा मृत्यू ओढावल्यास मग रक्कम कोणाला मिळते?

Small Savings Schemes : वारस न नेमताच ओढावला खातेदाराचा मृत्यू, तर पैसे मिळतील कोणाला?
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 9:13 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या अल्पबचत योजना (Small Savings Schemes) चालविते. जर तुम्ही पण या योजनांमध्ये गुंतवणुकीची योजना आखत असाल तर सर्वात अगोदर डेथ क्लेमविषयी (Death Claim) माहिती घ्या. नाहीतर तुमच्या नंतर वारसांना नाहक कार्यालयाचे हलेपाटे तर मारावेच लागतील, पण काही परिस्थितीत कोर्टाचाही दरवाजा ठोठावावा लागेल. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. अनेकदा गुंतवणूकदार जोशात अल्प बचत योजना सुरु करतात. पण त्यामध्ये वारसाचे नाव टाकत नाही. अथवा ते टाकणे त्यांना आवश्यक वाटत नाही. पण खातेदाराच्या अचानक मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना खात्यातील हक्काची रक्कम काढण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. अशावेळी वारसाचे नाव नसल्यास काय होते, ही रक्कम कोणाला मिळते, त्यासंबंधीची प्रक्रिया काय आहे, अशा अनेक प्रश्नांची जंत्री समोर उभी ठाकते.

केंद्र सरकारने, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) या योजनांमध्ये आता डेथ क्लेम सोपा झाला आहे.

अल्पबचत योजनांमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करण्यात आली. वारसाचे नाव जोडण्यात आले असेल तर वारसाकडील ओळखपत्रावरुन त्याला ती रक्कम देण्यात येते. 5 लाख रुपयांपेक्षा अधिकचा दावा करण्यात आला असेल तर वारसाचे कायदेशीर कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र, खात्याचे पासबुक, पोचपावती आणि शपथपत्र जमा करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

जर अल्पबचत योजनांच्या खातेदारांने त्याच्या खात्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून नेमले नसेल आणि त्याचा मृत्यू ओढावल्यास डेथ क्लेमची प्रक्रिया थोडी अडचणीची ठरते. गव्हर्नमेंट सेव्हिंग प्रमोशन ॲक्ट (Government Savings Promotion Act 1873) नुसार, जर एखाद्या खातेदाराने वारसाचे नाव न नोंदविल्यास , त्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर उत्तराधिकारी नेमल्याशिवाय ही रक्कम वारसाला मिळणार नाही.

हा पैसा खातेदाराच्या मृत्यूंतर सहा महिन्याच्या आत क्लेम करता येतो. त्यावर दावा सांगता येतो. त्यासाठी सर्वात अगोदर कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला उत्तराधिकारी प्रमाणपत्र (Succession Certificate), खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र, खातेदाराचे पासबुक, पोचपावती आणि शपथपत्र अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. या सर्व कागदपत्रांची अधिकारी छाननी करेल आणि त्यानंतर वारसदाराला खातेदाराची रक्कम मिळते.

  1. कोणत्या योजनांसाठी लागू आहे हा नियम
  2. पोस्ट ऑफिस बचत खाते
  3. राष्ट्रीय मासिक उत्पन्न बचत खाते
  4. राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव योजना
  5. सुकन्या समृद्धी योजना
  6. किसान विकास पत्र
  7. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.