आता डेबिट कार्डशिवाय ‘युपीआय’च्या माध्यमातून एटीएममधून काढा पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

विना डेबिट कार्ड आता बिनधास्त एटीएम मध्ये जावा. ना कार्ड वापरण्याची गरज ना एटीएमच्या बटनांची आकडेमोड, ना पासवर्ड, ना पिन, फक्त एटीएम स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमची रक्कम टाका. एटीएममधून रक्कम बाहेर येईल.

आता डेबिट कार्डशिवाय 'युपीआय'च्या माध्यमातून एटीएममधून काढा पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 9:20 AM

युपीआय पेमेंटच्या (UPI Payment) क्रांतीने बँकिंग क्षेत्रासह व्यवहारात ही गतिमानता आणली आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्हाला रक्कम वळती करता येते, बिल अदा करता येते, रक्कम अदा करता येते, विमा खरेदी करता येतो, गॅस बुकिंग करता येते आणिक काय, काय करता येते. तेही एकाच अ‍ॅपवर. तर मंडळी आता हेच युपीआय पेमेंट अ‍ॅप  तुम्हाला एटीएममध्ये (Bank ATM) ही उपयोगी ठरणार आहे. एटीएममध्ये डेबिट कार्ड वापरायची गरज आता भासणार नाही. देशातील काही ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून एटीएममधून रक्कम काढता येते. आता ही सोय देशातील सर्वच एटीएममध्ये लवकरच सुरु करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीचे दिशानिर्देश दिले आहेत. त्यामुळे विना डेबिट कार्ड आता बिनधास्त एटीएम मध्ये जावा. ना कार्ड वापरण्याची गरज ना एटीएमच्या बटनांची आकडेमोड, ना पासवर्ड, ना पिन, फक्त एटीएम स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमची रक्कम टाका. एटीएममधून रक्कम बाहेर येईल.

आरबीआयचे निर्देश

युपीआय पेमेंट अ‍ॅप पेटीएम, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे यासह तुम्ही वापरत असलेल्या युपीआय पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहाराची सुविधा देण्याचे निर्देश केंद्रीय बँकेने दिले आहेत. आता या निर्देशानंतर देशातील सर्व बँकांना त्यांच्या एटीएम मशीनमध्ये आवश्यक तो बदल करुन युपीआय पेमेंटसाठीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागेल. या नव्या पद्धतीत तुमचे डेबिट कार्ड व्यवहारातून हद्दपार होईल. ग्राहक युपीआय पिनच्या वापरातून त्यांची अधिकृतता सिद्ध करतील आणि एटीएम मशीन मधून रक्कम बाहेर येईल. विशेष म्हणजे एटीएममधून युपीआय अ‍ॅपद्वारे रक्कम काढण्याची ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असेल. कोविड काळात सुरक्षित आणि त्वरीत सेवेमुळे डिजिटल पेमेंटला लोकांनी प्रचंड पसंती दिली आणि या व्यवहारात प्रचंड वाढ झाली. यामध्ये राष्ट्रीय देयके महामंडळाने National Payments Corporation of India सुरु केलेल्या युपीआय या सेवेची सर्वात मोठी भूमिका आहे. मोबाईल वॉलेट अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणारे हे सर्व व्यवहार सुरक्षित आणि गतिशिल असल्याने ग्राहक कुठेही हा व्यवहार सहज आणि सोप्या पद्धतीने करु लागला. त्याचा परिणाम डिजिटल पेमेंट सेवा अनेक पटीत वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

अशी काढा विना कार्ड रक्कम

विना कार्ड एटीएममधून रक्कम काढण्याची सुविधा काही ठराविक बँकेतच उपलब्ध आहे. लवकरच ती देशभरातील एटीएममध्ये सुरु होईल. युपीआय पेमेंटसाठी एटीएम मशीनमध्ये थोडेफार बदल करावे लागणार आहेत. यामध्ये एटीएम मशीनमध्ये युपीआय पेमेंटचा पर्याय द्यावा लागेल. एटीएम मशीनच्या स्क्रीनवर क्युआर कोड द्यावा लागेल. ग्राहकाला त्याची इच्छित रक्कम एटीएम मशीनमध्ये नोंदवावी लागेल. त्यानंतर हा क्युआर कोड तुमच्याकडे असलेल्या भीम, गुगल पे, अ‍ॅमेझॉन, फोन पे, पेटीएम यापैकी एका युपीआय पेमेंट अ‍ॅपद्वारे स्कॅन करावा लागेल. तुमचा पिन टाकावा लागेल. सबमिटचे बटण दाबावे लागेल. त्यानंतर खात्यातील रक्कम वळती होऊन ती एटीएम मशीनमधून रोखीच्या स्वरुपात प्राप्त होईल.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.