Banking App: सावधान! मोबाईलमधल्या बँकिंग ॲपवर हल्ला करतोय ‘हा’ व्हायरस, सायबर सेलकडून अलर्ट

डिजिटल पेमेंट प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये असलेले बँकिंग ॲप खरंच सुरक्षित आहे का?

Banking App: सावधान! मोबाईलमधल्या बँकिंग ॲपवर हल्ला करतोय 'हा' व्हायरस, सायबर सेलकडून अलर्ट
मोबाईल बँकिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 5:03 PM

मुंबई, जर तुम्हीही पैशांच्या व्यवहारासाठी मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर सावध व्हा कारण आजकाल ट्रोजन व्हायरस थेट मोबाईलमधील बँकिंग ॲपला (Banking App) लक्ष्य करत आहे. सेंट्रल सायबर एजन्सीने यासंदर्भात अलर्ट जारी केला असून मोबाईलमधील ‘सोवा व्हायरस’ (SOVA Virus) बँकिंग ॲपप हॅक करत असल्याची माहिती दिली आहे. SOVA व्हायरसद्वारे कोणीही तुमचा Android फोन एन्क्रिप्ट करून खंडणी तसेच अवैध कामांसाठी वापर करू शकतो. सायबर सेलच्या मते मोबाईलमधून हा व्हायरस अनइंस्टॉल करणे देखील अवघड आहे.

केंद्रीय सायबर एजन्सीने जारी केली अधिसूचना

सेंट्रल सायबर सिक्युरिटी एजन्सी CERT-IN ने SOVA व्हायरसबाबत एक सल्ला जारी केला आहे. जुलैमध्ये CERT-In द्वारे भारतीय सायबर स्पेसमध्ये SOVA व्हायरस पहिल्यांदा आढळला होता.

तेव्हापासून SOVA व्हायरसच्या 5 व्हेरियंट अपग्रेड केल्या गेल्या आहेत आणि ते लॉगिनद्वारे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड प्राप्त करतात. त्याच वेळी, कुकीज तोडून आणि विविध प्रकारच्या ॲप्सचे खोटे जाळे विणून, ते वापरकर्त्यांची माहिती मिळवितात आणि त्यांना गंडा घालतात.

हे सुद्धा वाचा

अमेरिका, रशिया आणि स्पेनमध्येही झाले सायबर हल्ले

भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि स्पेनमध्येही SOVA व्हायरस सक्रिय झाला आहे. CERT-IN च्या मते, आतापर्यंत सुमारे 200 मोबाइल वापरकर्ते या व्हायरसला बळी पडले आहेत.

मोबाईल वापरकर्त्यांना अशा प्रकारे केले जाते लक्ष्य

सेंट्रल सायबर एजन्सीच्या ॲडव्हायझरीमध्ये माहिती दिली आहे की SOVA व्हायरसची नवीनतम आवृत्ती बनावट अँड्रॉइड ॲपमध्ये लपवून मोबाइल वापरकर्त्यांच्या खात्याची रेकी करतात.

या ॲप्समध्ये Chrome, Amazon, NFT सारख्या लोकप्रिय ॲप्सचे लोगो आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांची दिशाभूल केली जाते. त्यांना हे ॲप्स डाऊनलोड करण्याची सक्ती केली जाते आणि नंतर मोबाइलमधून डेटा चोरला जातो.

एकदा मोबाईल हॅक झाला की डेटा चोरणे सोपे होते. एकदा फेक अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्यानंतर, SOVA व्हायरस सर्व मोबाइल ॲप्सची माहिती C2 (कमांड आणि कंट्रोल) सर्व्हरवर पाठवतो.

जिथे बसलेला मास्टरमाइंड टार्गेट ॲप्सची यादी तयार करतो. ही यादी C2 ने सोवा व्हायरसला परत पाठवली आहे. हे सर्व माहिती XML फाइल म्हणून सेव्ह करते.

फक्त अधिकृत प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा

सेंट्रल सायबर एजन्सीने आपल्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, हा व्हायरस टाळण्यासाठी युजर्सनी फक्त अधिकृत ॲप स्टोअरवरून ॲप डाउनलोड करावे. कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती आणि ते किती वेळा डाऊनलोड झाले, तसेच त्याबद्दलचे यूजर्सचे रिव्हिव्ह आणि कमेंट्स अवश्य वाचावे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.