SBI: ना ऑनलाईन , ना बँकेत जाण्याची गरज, फक्त एका फोनवर तुमची बँकेतली कामं घरबसल्या होणार

आजकाल अनेक बँकांनी डोअरस्टेव बॅकिंग सुविधा सुरु केलेली आहे. SBI started doorstep banking

SBI: ना ऑनलाईन , ना बँकेत जाण्याची गरज, फक्त एका फोनवर तुमची बँकेतली कामं घरबसल्या होणार
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 1:25 PM

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँकेतील व्यवहारासंबंधी कोणतेही काम असेल तर बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा ऑनलाईन लॉगिन करण्याची गरज नाही. फक्त एका फोनवर तुमचं काम होऊ शकतं. एका फोनवर तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकता. जर, तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पैसे पोहोच करेल. याशिवाय पैसे जमा करायचे असतील तर बँक प्रतिनिधी पैसे जमा करण्याचं देखील काम करु शकतात. (State Bank of India SBI started doorstep banking know details about services you can use)

एसबीआयच्या कोणत्या सेवा सुविधा फोनवर उपलब्ध

आजकाल अनेक बँकांनी डोअरस्टेव बॅकिंग सुविधा सुरु केलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बँक ग्राहकांना घरपोहोचं बँक सेवा दिली जाते. बँक रोख रक्कम ग्राहकांना देणे, ग्राहकांकडून रक्कम स्वीकारणे, चेक जमा करुन घेणे, चेकची मागणी, फार्म 15H स्वीकराणे, डीमांड ड्राफ्ट डिलीव्हरी, टर्म डिपॉजिट सल्ला या शिवाय इतर सेवा देखील ग्राहकांना पुरवल्या जातात. केवायसी कागदपत्रे देखील स्वीकारली जातात.

कोणत्या ग्राहकांना सुविधा उपलब्ध

SBI च्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग नागरिक आणि ज्यांचं वय 70 वर्षाहून अधिक आहे त्यांच्यासाठी डोअरस्टेप बँकिंग सुरु करण्यात आलं आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे ग्राहकांचा मोबईल नंबर त्यांच्या खात्याशी लिंक असला पाहिजे.

किती शुल्क लागते?

Doorstep banking च्या कस्टमर केअर अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार रजिस्ट्रेशनसाठी 88.55 रुपये इतकं शुल्क प्रति व्यक्ति लागते. यानंतर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. बँकेची वेबसाईट, मोबाईल अ‌ॅप आणि नेट बँकिगद्वारे तुम्ही डोअरस्टेप बँकिंग सुरु करु शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही https://bank.sbi/dsb या वेबपेजवर भेट देऊ शकता. याशिवाय तुमचं खातं असलेल्या शाखेत देखील फोन करु शकता. 18001037188 आणि 18001213721 वर कॉल देखील करु शकता.

संबंधित बातम्या:

बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! आता KYC अपडेटची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

ही सिमेंट कंपनी आणत आहे 5000 कोटी रुपयांचा आयपीओ, आपल्यासाठी कमाईची उत्तम संधी

(State Bank of India SBI started doorstep banking know details about services you can use)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.