शेअर मार्केट कोसळले, सेन्सेंक्समध्ये 900 अंकाची घसरण; गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

शेअर विक्रीचा दबाव आणि रशिया युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) परिणाम शेअर मार्केटवर (Stock Market) होताना दिसून येत आहे. बुधवारी शेअर मार्केट सुरू होताच शेअर बाजार कोसळला. शेअर मार्केट सुरू होताच पहिल्याच सत्रामध्ये बाजार तब्बल 900 अकांनी कोसळला.

शेअर मार्केट कोसळले, सेन्सेंक्समध्ये 900 अंकाची घसरण; गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:58 PM

मुंबई : शेअर विक्रीचा दबाव आणि रशिया युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) परिणाम शेअर मार्केटवर (Stock Market) होताना दिसून येत आहे. बुधवारी शेअर मार्केट सुरू होताच शेअर बाजार कोसळला. शेअर मार्केट सुरू होताच पहिल्याच सत्रामध्ये बाजार तब्बल 900 अकांनी कोसळला. तर निफ्टी देखील 16600 च्या खाली आली. पहिल्या सत्रात काही वेळ बँकिंग, ऑटो आणि फार्मा क्षेत्रात तेजी दिसून आली मात्र त्यानंतर शेअरबाजार कोसळला. सेन्सेक्स (Sensex) 900 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी शेअर मार्केट सुरू होताच हेवीवेट, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स आणि इंफोसिस यांचे शेअर घसरले तर टाटा स्टील, एम अँड एम, रिलायंस इंडस्ट्रीज यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून याली. गेल्या सात दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम केवळ भारतीय शेअर बाजारावरच नव्हे तर संपूर्ण अशिया खंडातील शेअर बाजारावर झाल्याचे पहायला मिळत आहे.

गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

बुधवारी शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात सेंन्सेक्स तब्बल 900 अंकांनी कोसळला तर निफ्टी देखील सोळा हजारांच्या खाली आली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे तब्बल एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठवड्याच्या सोमवारी बीईएसई लिस्टेड कंपनीची एकूण मार्केट कॅप 52,39,045.09 कोटी रुपये इतकी होती. त्यामध्ये बुधवारी तब्बल 1,07,172.82 कोटी रुपयांची घट झाली आहे. बुधवारी मार्केट कॅप 2,51,31,872.27 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

कच्चे तेल प्रति बॅरल 110 डॉलरवर

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा कच्च्या तेलाच्या किमतींना बसत आहे. बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 4.67 टक्के वाढ झाल्याचे पहायला मिळाले. 4.67 टक्क्यांच्या दर वाढीसह कच्चे तेल 110 डॉलरवर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भविष्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

पतंजलीच्या ग्राहकांसाठी खुशखबर! बाबा रामदेव यांनी केले क्रेडिट कार्ड लाँच, प्रोडक्सवर मिळणार भरघोस सूट

जिद्द, चिकाटी आणि रागीट, कोण आहेत अशनीर ग्रोवर, ज्यांना स्वत:च्याच कंपनीतून निघावं लागलं?

रशिया-युक्रेन युद्धाचे ढग LIC IPO वर?  लाँचबद्दल नेमकं काय म्हणाल्या अर्थमंत्री

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.