September | शेअर बाजारातून इतकी कमाई, गुंतवणूकदारांना सप्टेंबर महिना पावला

September | शेअर बाजाराने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मालामाल केले. सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदांना मोठी कमाई करुन दिली.

September | शेअर बाजारातून इतकी कमाई, गुंतवणूकदारांना सप्टेंबर महिना पावला
बाजारात तेजीचे सत्रImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 2:02 PM

September | सप्टेंबर (September) महिन्यात शेअर बाजाराने (Share Market) गुंतवणूकदारांची चांदी केली. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात तेजी आल्याने गुंतवणूकदारांनी (Investor) कोट्यवधी रुपयांची कमाई केली. BSE सुचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल जवळपास 2 लाख कोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे सणासुदीच्या काळात हा एक चांगला संकेत समजल्या जात आहे.

4 लाख कोटी रुपयांची कमाई

शेअर बाजारातून या महिन्यात, सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातच दणक्यात झाली आहे.  त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी सुरु आहे. त्याचा फायदा भारतीय शेअर बाजाराला मिळत आहे. बुधवारी Dow Jones मध्ये 435.98 अंकांची तेजी आली. S&P 500 इंडेक्‍स मध्ये 1.83 टक्के तेजी होती. तर Nasdaq 2.14 टक्के आघाडीवर होता.

हे सुद्धा वाचा

आशियातील बाजारांचे चित्र

आशियातील बाजारात SGX Nifty 0.65 टक्क्यांसह आघाडीवर होता. निक्कईत 2 टक्क्यांची वाढ झाली. तर स्ट्रेट टाईम्स 0.86 टक्क्यांची वाढ झाली. ताईवान वेटेड 0.53 टक्के आणि कोस्‍पी 0.58 टक्क्यांनी मजबूत झाला.

क्रूड ऑईल घसरले

ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने मागणी घटली आहे. तेल बाजारात उठाव नसल्याने किंमती कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल, कच्च्या तेलाच्या किंमती 89 डॉलर प्रति बॅरलच्या मागेपुढे आहे. तर अमेरिकन कच्चे तेल 83 डॉलर प्रति बॅरल आहे.

बँक आणि IT शेअरमध्ये तेजी

बँकिंग, फायनानशियल आणि आयटी शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे. बँक, फायनानशियल आणि आयटी इंडेक्स सध्या तेजीत आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

परदेशी गुंतवणूकदार परतले

बाजारात परदेशी गुंतवणूकदार (FIIs) परतले आहेत. 7 सप्टेंबर रोजी FIIs ने 758.37 कोटी रुपयांची खरेदी केली. गेल्या काही महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे परतले आहेत. तर जुलैपूर्वी गुंतवणूकदारांनी विक्रीचा डाव मांडला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.