Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांना वर्षभरात दुप्पट परतावा, पुढेही तेजी राहण्याचा अंदाज

कोरोना काळात काही कंपन्यांचे शेअर्स हे Multibagger Stock ठरले, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट, तिप्पट नफा दिला. अशाच एका शेअर्सची आज आपण माहिती घेणार आहोत.

Multibagger Stock : 'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांना वर्षभरात दुप्पट परतावा, पुढेही तेजी राहण्याचा अंदाज
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:30 AM

गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे (Corona) सावट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांनी आपले रोजगार गमावले. कोरोनाचा जसा परिणाम हा सामान्य मानसांच्या जीवनावर झाला. तेवढाच परिणाम हा शेअर मार्केटवर देखील झाला. कोरोना काळात सर्वच ठिकाणी अनिश्चिततेचे वातावरण असल्याने गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीचा सपाटा लावला होता. या काळात शेअर्समधील गुंतवणूक कमी करण्यात येत होती. त्यामुळे शेअर मार्केट प्रचंड दबावाखाली होते. शेअर मार्केटमध्ये अनिश्चितेचे वातावरण एवढे वाढले होते की, तज्ज्ञांना देखील शेअर मार्केटमध्ये स्थिरता कधी येणार हे सांगणे कठीण होते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये वर्षभरात भारतीय शेअर बाजाराचे चित्र पालटल्याचे पहायला मिळाले. सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी आली. याच दरम्यान काही शेअर्सनी गुंतवणूकदाराना दुप्पट तिप्पट नफा देऊन मालामाल केले, अशाच एका शेअरची आज आपन माहिती घेणार आहोत. हा शेअर आहे बालाकृष्णन अँण्ड ब्रदर्स लिमिटेडचा (LG Balakrishnan and Brothers Limited) या कंपनीच्या शेअर्सने दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून चांगली कामगिरी

बालाकृष्णन अँण्ड ब्रदर्स लिमिटेडच्या शेअर्सची किंमत 293 रुपयांपासून वाढून 627 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या शेअर्समध्ये तब्बल 114 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. केवळ मागच्या वर्षीच नाही तर गेल्या दहा वर्षांपासून या कंपनीचा शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देत आला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या शेअर्सच्या किमतीमध्ये तब्बल 700 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीने समजा वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याला वर्षभरात तब्बल 2.14 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

बालाकृष्णन अँण्ड ब्रदर्स लिमिटेडची मार्केट कॅप सध्या स्थितीमध्ये 1,928 कोटी रुपये आहे. या स्टॉकबाबत बोलताना ग्रीन पोर्टफोलियोचे संस्थापक दिवम शर्मा यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांचा अभ्यास केल्यास या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्या योग्य स्थिती आहे. पुढील काही वर्ष या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

संबंधित बातम्या

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्समध्ये 350 अंकांची वाढ, टाटा स्टील टॉप गेनवर

महागाईचा कहर! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, FMCG वस्तूंच्या खरेदीत घसरण

LIC IPO या महिन्याच्या शेवटी गाठणार मुहूर्त; 12 मेपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.