Defense Stocks | शेअर बाजारात रहा ‘डिफेन्स’ मोडवर, या सरकारी शेअर्समधील गुंतवणूक वर्षभरातच करणार श्रीमंत..काय म्हणतात तज्ज्ञ..

Defense Stocks | शेअर बाजारात डिफेन्स सेक्टरमधील या स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. तर येत्या वर्षभरात हे शेअर अजून तेजीत राहण्याचा अंदाज आहे.

Defense Stocks | शेअर बाजारात रहा 'डिफेन्स' मोडवर, या सरकारी शेअर्समधील गुंतवणूक वर्षभरातच करणार श्रीमंत..काय म्हणतात तज्ज्ञ..
हे स्टॉक करतील मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 5:37 PM

Defense Stocks | शेअर बाजारात डिफेन्स सेक्टरमधील (Defense Sector) या स्टॉकमुळे गुंतवणूकदार (Investors) मालामाल झाले आहेत. तर येत्या वर्षभरात हे शेअर अजून तेजीत राहण्याचा अंदाज आहे. हे शेअर 30 टक्के परतावा (Return) देण्याचा अंदाज ब्रोकरेज फर्म व्यक्त करत आहेत.

इक्विटी रिसर्च फर्म ICICI डायरेक्‍टने सरकारी कंपनी माझगांव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने 12 महिन्यांसाठी टार्गेट प्राईस 560 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

माझगाव डॉकचा शेअर 16 सप्टेंबर 2022 रोजी 457.40 रुपयांच्या त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले आहे. शेअर बाजार पडला असला तरी त्याचा या शेअरवर परिणाम झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात हा शेअर 432.30 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये आज 3.32 टक्क्यांची तेजी दिसून आली.

1934 मध्ये मझगांव डॉक शिपबिल्डर्स (MDL) स्थापन करण्यात आले. सुरक्षा मंत्रालयासाठी MDL ही युद्धनौका आणि सबमरीन बांधून देते. त्याच्या दुरुस्तीचे काम करते. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 8,711 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्‍टच्या अंदाजानुसार, हा शेअर 560 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या शेअरमध्ये जवळपास 30 टक्क्यांची तेजी दिसून येईल.

या कंपनीचा येत्या 2 वर्षांतील महसूल CAGR 18.2% राहण्याची शक्यता आहे. मागील आर्थिक वर्षात FY19-22 मध्ये हा महसूल 7.5% होता. तर सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे पुढील आर्थिक वर्षात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

ICICI डायरेक्‍टनुसार, यंदा संरक्षण उत्पादन खरेदीसाठी 1.24 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. यातील 84,598 कोटी रुपये (68 टक्के) देशातंर्गत तयार झालेल्या शस्त्र खरेदीसाठी वापरण्यात आले.

डिफेंस सेक्टरमध्ये आत्मनिर्भतेवर जोर देण्यात येत आहे. पुढील आर्थिक वर्षात सुरक्षा बजेट वाढेल. त्याचा फायदा माझगांव डॉकयार्डला होणार आहे.

कंपनीकडे ऑगस्ट 2022 पर्यंत 43,343 कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. येत्या काही वर्षात भारतीय नौसेनेसाठी MDL आणखी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

( सूचनाः या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. गुंतवणूकदारांनी संशोधन, अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.)

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.