150 रुपयांत रेल्वे करते राहण्याची व्यवस्था, असा घेऊ शकता फायदा

Indian Railway | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वे यात्रेकरुंसाठी रेल्वे अवघ्या 150 रुपयांत रेल्वे स्टेशनवर राहण्याची व्यवस्था करते. दुसरी ट्रेन पकडण्यासाठी वेळ असेल अथवा इतर काही कामासाठी राहणे आवश्यक असेल, अशावेळी रेल्वेच्या या सुविधेचा तुम्हाला फायदा घेता येईल.

150 रुपयांत रेल्वे करते राहण्याची व्यवस्था, असा घेऊ शकता फायदा
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 2:52 PM

नवी दिल्ली | 7 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी थांबण्याची सोय करुन देते. प्रवाशांसाठी रिटायरिंग रुम उपलब्ध करुन देते. IRCTC ही सोय उपलब्ध करुन देते. कोणताही प्रवाशी ही रुम बुक करु शकतो. ट्रेन काही कारणामुळे एकदम उशीरा येणार असेल. त्याच रेल्वे स्टेशनवरुन काही तासानंतर दुसरी रेल्वे पकडायची असेल तर रिटायरिंग रुमची सोय फायदेशीर ठरते. यामुळे अवघ्या काही तासांकरीता हॉटेल शोधण्याची आणि तिथे अधिक भाडे करुन राहण्याची गरज नसते. रेल्वेच्या रिटायरिंग रुममध्ये स्वच्छ तर असतातच पण त्याठिकाणी अन्य सोयी-सुविधा पण मिळातात. हा सुविधा सुरक्षित आणि आरामदायक असतात.

इतकी असते किंमत

रिटायरिंग रुमची किंमत अत्यंत कमी असते. तुमच्या आरामाच्या प्रकारानुसार, सोयी-सुविधानुसार त्यात प्रकार पडतात. त्यांची किंमत साधारणपणे 100 ते 700 रुपयांदरम्यान असते. यामध्ये एसी, नॉन-एससी रुमचा पर्याय मिळतो. रिटायरिंग रुमची बुकिंग आयआरसीटीसीचे संकेतस्थळ अथवा एपवरुन करता येते. विविध रेल्वे स्थानकावर रुमची किंमत वेगवेगळी असते. नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर नॉन एसी रुमची किंमत 12 तासांकरीता 150 रुपये आहे. तर एसी रूमची किंमत 24 तासांकरीता 450 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

ब्रेक घेऊन पुन्हा प्रवास

या नियमाविषयी अनेक लोकांना माहितीच नाही. तुम्ही 500 किमीपेक्षा जास्त प्रवास करत असाल, तर तुम्ही ब्रेक घेऊ शकता. तुमचा प्रवास एक हजार किलोमीटरचा असेल तर तुम्ही दोनदा ब्रेक घेऊ शकता. जेव्हा तुम्ही प्रवासाला सुरुवात करतात आणि उतरता, या दरम्यान दोन दिवसांचा ब्रेक घेता येतो. हा नियम शताब्दी, जनशताब्दी आणि राजधानी या सारख्या आलिशान रेल्वेसाठी लागू नाही.

कसे कराल बुकिंग

  • तुम्ही रिटायरिंग रुम एक तासापासून ते 48 तासांपर्यंत बुक करु शकता.
  • काही रेल्वे स्टेशनवर प्रति तासाच्या हिशोबाने बुकिंगची सुविधा मिळते.
  • रिटायरिंग रुम बुक करण्यासाठी आयआरसीटीसीची साईट अथवा एपवर लॉगिन करावे लागेल.
  • My Booking पर्यायावर क्लिक करा. रिटायरिंग रुमचा पर्याय निवडा.
  • यावर क्लिक करुन तुम्ही रुमचे बुकिंग करु शकता. लॉगिन झाल्यावर तुमचा पीएनआर क्रमांक नोंदवा.
  • त्यानंतर तुमच्या नावाने रुमची बुकिंग होईल. तुम्ही याठिकाणी निवडलेल्या पर्यायानुसार थांबू शकता.
Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.