मुंबई: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे . सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार आहे. बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांचे डेबिट कार्ड इतर बँकांच्या एटीएममध्ये वापरण्याचा पर्याय उपलब्ध राहील. तांत्रिक अडचणींमुळे बँकेने हा निर्णय घेतल्याचे समजते.
मात्र, तुम्ही तुमच्या सूर्योदय बँकेच्या एटीएम / डेबिट कार्डचा वापर तुमच्या इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरू ठेवू शकता, असे बँकेने ग्राहकांना दिलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे. 30 जूनपर्यंत, सूर्योदय एसएफबीकडे एकूण 555 बँकिंग आउटलेट होते, त्यापैकी 97 लायबिलिटी फोकस आउटलेट होते आणि 30 जून रोजी एकूण कर्मचारी संख्या 5,072 होती.
इतर बँकिंग सेवांसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर करू शकतात. पिन बनवणे, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स तपासणे इत्यादी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे उपलब्ध होतील.
आमच्या बँकेच्या एटीएम केंद्रांचा ग्राहकांकडून म्हणावा तसा वापर होताना दिसत नव्हता. त्यामुळे एटीएम केंद्रे सुरु ठेवणे फारसे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे आम्ही बँकेची एटीएम केंद्रे बंद करुन त्याऐवजी ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएम केंद्रांवर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर.भास्कर बाबू यांनी सांगितले. अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने रोख पैसे काढण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे बँकेने एटीएम केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे आर.भास्कर बाबू यांनी म्हटले.
* 1 ऑक्टोबरपासून एटीएम/डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी असेल. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 आणि 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी लागू असतील. याशिवाय, पोस्टाकडून आता आपल्या डेबिट कार्डधारक ग्राहकांकडून एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये (जीएसटीसह) आकारले जातील. हे शुल्क डेबिट कार्डधारकांना पाठविलेल्या एसएमएस अलर्टसाठी वार्षिक शुल्क असेल.
* तुम्ही पोस्टाचे एटीएम हरवले किंवा ते गहाळ झाले तर नवीन कार्डासाठी 1 ऑक्टोबरपासून 300 रुपये भरावे लागतील. एटीएम पिन क्रमांक हरवला तर 1 ऑक्टोबरपासून डुप्लिकेट पिनसाठी शुल्क भरावे लागेल. पिन पुन्हा व्युत्पन्न करण्यासाठी किंवा शाखेद्वारे डुप्लिकेट पिन मिळवण्यासाठी 50 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क आकारले जाईल.
* बचत खात्यात शिल्लक नसल्यामुळे एटीएम किंवा पीओएस व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकाला 20 रुपये अधिक जीएसटी असा दंड भरावा लागेल.
* पोस्ट विभागाने एटीएममध्ये करता येणाऱ्या मोफत आर्थिक व्यवहारांची संख्याही मर्यादित केली आहे. पोस्टाच्या एटीएममध्ये पाच मोफत व्यवहार केल्यानंतर आर्थिक व्यवहारांवर 10 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल. इतर एटीएममध्ये आर्थिक व्यवहार, मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहार किंवा नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहार झाल्यानंतर 20 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.
* पोस्टाच्या स्वतःच्या एटीएममध्ये बिगर आर्थिक व्यवहारासाठी, ग्राहकाला पाच मोफत व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 5 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क द्यावे लागेल. इतर बँकांच्या एटीएमच्या बाबतीत, मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहार किंवा नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहारानंतर, व्यक्तीला 8 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.
* डेबिट कार्डधारकांना पॉईंट ऑफ सर्व्हिस (पीओएस) वर रोख रकमेच्या व्यवहाराच्या 1% रक्कम भरावी लागेल. प्रत्येक व्यवहारात जास्तीत जास्त 5 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.
संबंधित बातम्या:
फक्त तीन दिवस उरले, मोदी सरकार नियम बदलणार?; नोकरदारांना 12 तास काम, 15 मिनिटांचाही ओव्हरटाईम
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका