Tax on lottery | बंपर लॉटरी लागली..पण जीएसटीचा किती फटका बसेल माहिती आहे का?
Tax on lottery | बंपर लॉटर तर लागली. पण त्यावर किती टॅक्स द्यावा लागेल? ही गोष्ट माहिती आहे का?..
नवी दिल्ली : केरळचा ऑटो रिक्शा चालक(Auto Driver) अनूप याचं रविवारी कोण नशीब उघडलं! त्याला 25 कोटी रुपयांची लॉटरी (Lottery) लागली. पण प्रश्न उरतो की, टॅक्स कपातीनंतर (tax deduction) अनूपच्या हातात येणारी रक्कम किती असेल? कर किती टक्के कपात होतो?
जॅकपॉट लागला, ऑनलाईन लॉटरी जिंकली, KBC या लोकप्रिय प्रश्न मंजुषा स्पर्धेत तुम्ही कोट्यवधी रुपये जिंकले तर तुम्हाला करा व्यतिरिक्त अजूनही काही प्रक्रिया करावी लागते का? का एकदाच कर भरल्यावर सगळं संपतं असं होतं. चला तर शोध घेऊयात..
तर लॉटरी, जॅकपॉट, करोडपती झाल्यावर सहाजिकच त्यावर कर द्यावा लागतो. राज्य शासन अशा रक्कमेवर कर लावते. परंतु, तुम्हाला त्याशिवाय प्राप्तिकर ही जमा करावा लागतो. ITR द्यावा लागतो. ही गोष्ट अनेकांना माहितीच नसते.
प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळानुसार, जर एखादी व्यक्ती ऑनलाईन गेम, स्पर्धेत जिंकते. बक्षिस, इनाम मिळवते. तर त्याला 30 टक्के कर द्यावा लागतो. व्यक्तीने जिंकलेल्या रक्कमेतून ही रक्कम कपात करण्यात येते. उर्वरीत रक्कम त्याच्या हातात देण्यात येते.
म्हणजे तुम्ही एक कोटी रुपये जिंकले. तर त्यातील 30 टक्के रक्कम कपात होते. उर्वरीत रक्कम विजेत्याच्या हातात देण्यात येते. म्हणजे कर कपातीनंतरच विजेत्याच्या हातात रक्कम देण्यात येते. काही खेळांमध्ये ही रक्कम नंतर ही कपात करण्यात येते.
क्लिअर टॅक्स या संकेतस्थळानुसार, एखादी व्यक्ती 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकत असेल तर त्याला प्राप्तिकर खात्याच्या कायद्यातील 194B नियमनुसार, एकूण 31.2 टक्के टीडीएस द्यावा लागतो.
येथे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न अगदी कमी असेल. ती व्यक्ती करपात्र ठरत नसेल आणि त्याला लॉटरी लागली. तरीही त्याला या लॉटरी, ऑनलाईन गेमिंगवर 30 टक्के कर द्यावा लागतोच. त्यातून त्याची सूटका होत नाही.
जर रोख स्वरुपात रक्कम जिंकली नसेल, तर? नियमात कोणताही बदल होत नाही. तुम्ही रोख स्वरुपात रक्कम जिंकली असेल तर कर आणि वस्तू स्वरुपात वस्तू जिंकली तर कर माफी मिळत नाही. त्यावरही तुम्हाला कर चुकता करावा लागतोच.
कार अथवा इतर महागड्या वस्तू जिंकल्या असल्या तरी तुम्हीला कर द्यावा लागतो. त्यासाठी त्या वस्तूचे बाजारमूल्य तपासण्यात येते. त्याआधारे त्यावर कर लावण्यात येतो. हा कर ही अनेकदा अगोदरच वसूल करण्यात येतो.
इकोनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT)अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी एका मुलाखतीत याविषयी स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, ऑनलाईन गेम, बेटिंग अथवा लॉटरीतील विजेत्यांना आयटीआर भरणे अनिवार्य आहे.
जर विजेत्यांनी जिंकलेल्या रक्कमेविषयी माहिती दिली नाही. आयटीआर जमा केला नाही तर त्यांच्यावर भारीभक्कम दंड लावण्यात येतो. प्रसंगी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येते.
विजेत्यांनी माहिती देण्यास उशीर केला तर मूल्याआधारीत वर्षात याविषयीची माहिती दिली नाही तर त्यांना ITR-U फाईल करता येतो. 31 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत याची माहिती दाखल करता येते. तसे न केल्यास मात्र दंडाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागते.
सध्या 13 राज्यांमध्ये लॉटरी वैध आहे. तर इतर राज्यांमध्ये लॉटरीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार, राज्य सरकार त्यांच्या राज्यात लॉटरीविषयीचा निर्णय घेऊ शकतात. तर 1998 च्या कायद्यातील तरतुदीनुसार, इतर राज्यातील लॉटरीला प्रतिबंध घालू शकतात.