TCS Job : संधी आली चालून! TCS देणार इतक्या लाख जणांना नोकरी, तुम्ही तयारी सुरु केली का?
TCS Job : आयटी सेक्टरमधील टीसीएसमध्ये लवकरच नोकरी उपलब्ध होत आहे.
नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तरुणांना लवकरच नोकरीची संधी मिळणार आहे. टाटा कन्सलटन्शी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी आहे. या कंपनीत लवकरच विविध पदांसाठी भरती ((Job 2023) होत आहे. सोमवारी संध्याकाळी कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे प्रदर्शन जोरदार राहिले. कंपनीच्या एकूण नफ्यात 10.98 टक्क्यांची वाढ झाली. तिसऱ्य तिमाहीत टीसीएसचा (TCS) एकूण नफा 10,883 कोटी रुपये होता. पुढली आर्थिक वर्षी 1.25 लाख लोकांना कंपनीने रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरत्या वर्षात 2022 मध्ये अॅमेझॉन आणि ट्विटर सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले. 2023 ची सुरुवातच चांगल्या बातमीने झाली. TCS ने FY24 मध्ये 1.25 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
या सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 2,197 ने घटली होती. सध्या कंपनीकडे 6.13 लाख कर्मचारी आहेत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत एकूण कर्मचाऱ्यांमध्ये काही जण कमी झाले. पण या आर्थिक वर्षांत कंपनीने कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 1.03 लाख नवीन उमेदवारांना नोकरी दिली. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 2,197 कर्मचारी कमी झाले. पण आतापर्यंत कंपनीने 55,000 जणांना नोकरी दिली आहे. नोकरी देण्याची प्रक्रिया खंडीत झालेली नाही, तरुणांना नोकरी मिळणार आहे.
टीसीएसचे Chief HR मिलिंद लक्कड यांनी या नवीन भरतीविषयी माहिती दिली. त्यानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंत 42,000 नवीन जणांना कंपनीने नोकरी दिली आहे. तरीही कंपनीत भरती प्रक्रिया थांबलेली नसून नवीन उमेदवारांसाठी संधी उपलब्ध होत आहे.
Chief HR मिलिंद लक्कड यांच्या मते, कंपनी या आर्थिक वर्षात, 2023-23 मध्ये 40,000 नवीन तरुणांना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 42,000 तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. तसेच पुढील वर्षासाठीही कंपनीची याविषयीची योजना आहे.