Crorepati Investment Tips : रोज दोन वेळचा चहा सोडा, करोडपती व्हा! हसण्यावर न्याल तर फसाल

Crorepati Investment Tips : केवळ दोन कप चहा सोडला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला ही गंमत वाटेल. पण रोजच्या 20 रुपयांत तुम्हाला करोडपती होता येईल.

Crorepati Investment Tips : रोज दोन वेळचा चहा सोडा, करोडपती व्हा! हसण्यावर न्याल तर फसाल
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 10:25 AM

नवी दिल्ली : करोडपती (Crorepati) कोणाला व्हावसं वाटणार नाही? पण तुम्हाला वाटेल, त्यासाठी खूप कष्ट आणि प्रचंड पैसा मिळायला हवा. तर हा तुमचा गैरसमज आहे. गल्लेलठ्ठ पगार, अथवा रोजची मोठी कमाई नसतानाही तुम्हाला करोडपती होता येते. तुम्हाला केवळ दोन वेळेच्या चहाच्या कटिंगच्या (Two Cup of Tea) पैशांतून करोडपती होता येईल. आता तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. अवघ्या 20 रुपयांत तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. हे वाचलेले 20 रुपये तुमचे नशीब पालटवू शकतात. जास्त चहा तसाही आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे चहा सोडून एक प्रकारे तुमचे डिटॉक्स तर होईलच पण हा खर्च गुंतवणुकीत वळवला तर मोठा फायदा पण होईल. हा फॉर्म्युला तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही.

आम्हाला माहिती आहे, ही गोष्ट तुमच्या अजूनही पचनी पडली नाहीये. तुम्हाला वाटत असेल, असं झालं असतं तर आज समाजात सर्वच श्रीमंत झाले असते. ही गोष्ट ही खरीच आहे. पण सर्वच जण या कल्पनेचे खिल्ली उडवून बचत करत नाहीत. तर काहींना चहा सोडवत नाही. 20 रुपयांचा चहा तुमचं नशीब पालटवू शकतो, हे तुमच्या कधी गावी आलं नसेल, पण तुम्ही दृढ निश्चय केला आणि नियमीत बचत केली तर करोडपती होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि सिस्टेमॅटिक इन्व्हेसटमेंट प्लॅनविषयी (SIP) तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्ही दिवसाठी दोन कप चहा सोडला आणि रोज वीस रुपयांची एसआयपीत बचत केली, तर दीर्घकालावधीनंतर जोरदार परताव्या आधारे तुमच्याकडे सर्व सूखसोयी पायाशी लोटांगण घेतील. एक कप चहा साधारणपणे 10 रुपयांना मिळतो. दोन कट चहा 20 रुपयांना येईल. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर मोठा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

दिवसाकाठी 20 रुपयांची बचत एसआयपीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला 600 रुपये जमा होतात. आता तुम्हाला प्रत्येक दिवसाची, आठवड्याची, महिना, तिमाही, सहामाही आणि वार्षिक एसआयपी करता येते. अनेक म्युच्युअल फंडांनी आता अमुलाग्र बदल केला आहे. त्यांच्या ॲपच्या सहायाने तुम्हाला सहज एका क्लिकवर ही गुंतवणूक करता येते.

कुठलाही खंड न पडू देता, तुम्ही 35 वर्षे एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर जोरदार फायदा होईल. साधारणपणे 12 टक्के परतावा मिळाल्यास तुम्ही लखपती व्हाल. 18 टक्के रिटर्न मिळाल्यास करोडपती व्हाल. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हा प्रयोग उपयोगात येऊ शकतो.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग एसआयपी आहे. या आधारे दर महा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. एसआयपी हा बँकेच्या आवर्ती ठेव योजनेसारखा, म्हणजे आरडी सारखी आहे. पण एसआयपी तुम्हाला बँकेपेक्षा अधिक रिटर्न देतो. तुमच्या बँक खात्यातूनव दर महा निश्चित तारखेला एसआयपीद्वारे रक्कम कपात होते आणि त्यावर जोरदार परतावा मिळतो.

जर एखाद्या तरुणाने नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेत, एसआयपीत 20 व्या वर्षी गुंतवणूक सुरु केल्यास त्याला करोडपती होता येईल. त्याने महिन्याला 600 रुपयांची एसआयपी सुरु केल्यास, 480 महिन्यात तो एकूण 2,88,.000 रुपये जमा करेल. त्यावर 15 टक्के परतावा गृहीत धरल्यास 1,88,42,253 रुपये मिळतील. जर नशीब बलवत्तर असेल आणि हा 20 टक्के परतावा मिळाला तर ही रक्कम 10,18,16,777 रुपये मिळेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.