Aadhaar Card : मोठी अपडेट! मोदी सरकारचे मोठे पाऊल, तुमच्या नंतर आधार कार्डचे काय करणार?

Aadhaar Card : आधार कार्डविषयी केंद्र सरकार लवकरच नवीन नियम आणत आहे. त्यामुळे आधार कार्डच्या दुरुपयोगाला रोखता येणार आहे. याविषयीचा निर्णय लवकरच होईल. त्यामुळे अनेक लोकांचा मनस्ताप वाचणार आहे. तसेच फसवणूकही टळणार आहे.

Aadhaar Card : मोठी अपडेट! मोदी सरकारचे मोठे पाऊल, तुमच्या नंतर आधार कार्डचे काय करणार?
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 8:45 PM

Aadhar Card News: आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर आता प्रत्येक ठिकाणी होतो. प्रत्येक नागरिकाकडे हे महत्वपूर्ण ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्याआधारे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात. बँक खाते उघडण्यासाठी, शाळेत प्रवेश घेताना, सिमकार्ड खरेदीसाठी, पासपोर्ट तयार करण्यासाठी, गॅस सिलेंडरची सबसिडी मिळवण्यासाठी, जवळपास अनेक कामात आधार कार्डची गरज पडते. अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक मागण्यात येतो. हे ओळखपत्र प्रत्येक भारतीयांसाठी आवश्यक झाले आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी एक मोठं पाऊल टाकणार आहे. त्यामुळे आधार कार्डच्या दुरुपयोगाला रोखता येणार आहे. याविषयीचा निर्णय लवकरच होईल. त्यामुळे अनेक लोकांचा मनस्ताप वाचणार आहे. तसेच फसवणूकही टळणार आहे.

तर तुमच्या मृत्यूनंतर आधार कार्डचे काय करण्यात येते, हा सवाल अनेकांच्या मनात घोळतो. केंद्र सरकार आणि युआयडीएला पण या प्रश्नाने हैराण केले आहे. कारण त्यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग वाढल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आता युआयडीएआय आधार कार्डधारकाच्या मृत्यूनंतर एक सुविधा देणार आहे. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र मिळताच, संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड आपोआप निष्क्रिय होणार आहे. म्हणजे एक आधार क्रमांक त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बंद होईल.

कसे होईल हे काम

हे सुद्धा वाचा

मृत्यू प्रमाणपत्रानंतर मयताच्या कुटुंबियांना यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. अधिकारी अशा कुटुंबियांना भेटतील. मयताच्या नावे असलेली संपत्ती, बँकेतील पैसा, इतर गुंतवणूक त्याच्या वारसदारांना दिल्यानंतर निष्क्रियेतीची प्रक्रिया सुरु होईल. एका मीडिया रिपोर्टनुसार, हा फैसला लागू करण्यासाठी सध्या राज्य सरकारांसोबत चर्चा सुरु आहे. आधार 2.0 कार्यक्रमातंर्गत हे पाऊल टाकण्यात येत आहे. यामुळे आधार कार्डविषयीची विश्वसनीयता वाढेल. तसेच नागरिकांना सोयी-सुविधा ही वाढविण्यात येत आहे. आधार अपडेट करण्यासाठी सुविधा देण्यात येईल.आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना युआयडीएआय ते अपडेट करण्यासाठी दबाव टाकत आहे.

जन्म प्रमाणपत्रासाठी आधार

यापूर्वी UIDAI ने एक तंत्र सुरु केले आहे. त्यानुसार, जन्म प्रमाणपत्रासोबतच आधार क्रमांक देण्यात येत आहे. आतापर्यंत 20 हून अधिक राज्यांमध्ये ही प्रणाली सुरु झाली आहे. इतर राज्य पण लवकरच ही प्रणाली स्वीकारणार आहे. आतापर्यंत आधार कार्ड स्वंयचलितपणे निष्क्रिय होत नव्हते. पण आता मृत्यू प्रमापणत्र सादर करुन ते निष्क्रिय करण्याची प्रक्रिया मागे पडणार आहे. आता मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्याच्या काही दिवसांनी आधार क्रमांक आपोआप निष्क्रिय होणार आहे. मृत्य व्यक्तीच्या आधाराच गैर वापर टाळण्यासाठी कुटुंबियांना मयताचे बायोमॅट्रिक लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.