Home Loan : गृहकर्जाचे ओझे उतरेल झटपट, हा उपाय येईल कामी

Home Loan : गृहकर्जाचे ओझे वाहता कशाला, या उपायांनी कर्ज होईल कमी

Home Loan : गृहकर्जाचे ओझे उतरेल झटपट, हा उपाय येईल कामी
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 6:16 PM

नवी दिल्ली : स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थातच सर्वसामान्यांना गृहकर्जाशिवाय (Home Loan) दुसरा उपाय नसतो. त्यासाठी दर महिन्याला ईएमआय (EMI) भरावा लागतो. एकीकडे महागाई वाढली आहे. तर दुसरीकडे व्याजदर वाढल्याने हप्त्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन रेपो दरात (Repo Rate) वाढ करते. त्यामुळे ईएमआयमध्येही वाढ होते. त्याचा कर्जदारांच्या खिशावर भार पडतो. दरमहा अधिकचा ईएमआय भरावा लागत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पण गृहकर्जासंबंधी काही उपाय केले तर त्यामुळे तुमचे गृहकर्ज झटपट कमी होईल.

गृहकर्जाचे ओझे कमी करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे दरवर्षी कमीत कमी एकदा तरी शिल्लकचा हप्ता भरावा लागेल. जर तुम्ही गृहकर्जाचे 20 ते 25 टक्क्यांचा शिल्लकचा हप्ता जमा कराल तर तुमच्या गृहकर्जाचा हप्ता खूप कमी होईल. त्याचा फायदा तुम्हाला होईल.

आणखी एक उपाय म्हणजे, गृहकर्ज दीर्घ कालावधीसाठी घेताना, ते फार ताणेल एवढेही फेडू नका. म्हणजे कर्ज परतफेडीचा कालावधी कमी ठेवा. कर्ज परतफेडीचा कालावधी कमी करा. त्याने व्याजाचा हप्ता जरी वाढला तरी व्याज कमी मोजावे लागेल. कर्जदाराने वर्षातून एकदा तरी कर्जाचा हप्ता फेडणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

बँक गृहकर्ज फेडताना 2 पर्याय देतात. तुम्ही ईएमआय कमी करु शकता. पण दुसरीकडे तुम्हाला गृहकर्जाची परतफेड जास्त कालावधीसाठी करावी लागेल. दुसऱ्या पर्यायात अर्थातच कर्ज परतफेडीचा कालावधी कमी करुन जास्तीचा ईएमआय द्यावा लागेल. त्यामुळे 10 टक्के ईएमआय वाढेल.

कर्जदारांनी कमी कालावधीत कर्ज फेडीचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. हप्ता वाढला तरी तुम्हाला व्याजाच्या रुपाने जास्त रक्कम द्यावी लागणार नाही. तुम्हाला कर्जावर कमी व्याज द्यावे लागेल. तसेच कर्जाची परतफेडही लवकर करता येईल.

गेल्या आठ महिन्यात नागरीक वाढत्या महागाईने बेजार झालेले आहेत. कर्जदारांना तर मोठा फटका सहन करावा लागला आहे. आठ महिन्यांत 30 लाखांच्या गृहकर्जासाठी आता जवळपास 4200 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

एप्रिल 2022 च्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये जवळपास 18 टक्क्यांची वृद्धी दिसून येत आहे. जर होम लोन तुम्ही 30 वर्षांसाठी घेतले असेल तर त्यासाठी कर्जदारांचा ईएमआय जवळपास 24 टक्क्यांनी वाढला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.