पत्नीकडून 10 हजार उसने घेत सुरु केली कंपनी, आज झाला वटवृक्ष

सात मित्रांनी मिळून इन्फोसिस कंपनी सुरू केली होती. नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, एसडी शिबुलाल, क्रिस गोपालकृष्णन, अशोक अरोरा, एन. एस. राघवन आणि के. दिनेश या सात मित्रांनी मिळून इन्फोसिस कंपनी सुरू केली ही कंपनी सुरू करण्या मागचा प्रवास हा अत्यंत खडतळ असा होता.

पत्नीकडून 10 हजार उसने घेत सुरु केली कंपनी, आज झाला वटवृक्ष
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:40 PM

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये (infosys) आज 3 लाखांहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. अलीकडेच, कंपनीने मार्चच्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. कंपनीने मार्चच्या तिमाहीत तब्बल 5,686 कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Net profit) कमावला आणि कंपनीचा महसूल वाढून 32,276 कोटी रुपये झाला आहे. कंपनी यावर्षी 85 हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. आज जरी इन्फोसिस एवढी मोठी कंपनी बनली असली तरी तिच्या सुरवातीची कहाणी तुमच्या अंगावर रोमांच उभा करणारी आहे. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती (narayana murthy) यांनी त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून 10 हजार रुपये कर्ज घेऊन ही कंपनी सुरू केली होती. आज या कंपनीचा वटवृक्ष बनला आहे.

सात मित्रांनी मिळून सुरू केली कंपनी

सात मित्रांनी मिळून इन्फोसिस कंपनी सुरू केली होती. नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, एसडी शिबुलाल, क्रिस गोपालकृष्णन, अशोक अरोरा, एन. एस. राघवन आणि के. दिनेश असे या सात मित्रांची नावे आहेत. कंपनी सुरू करण्यापूर्वी हे सातही जण पटनी कॉम्प्युटर सिस्टिममध्ये एकत्र काम करायचे. नारायण मूर्ती यांच्याकडे कंपनी सुरू करण्यासाठी भांडवल नव्हते, म्हणून त्यांना पत्नी सुधा मूर्ती यांनी आपल्या बचतीतून 10 हजार रुपये कर्ज दिले, तेव्हा 1981 मध्ये इन्फोसिस सुरू करण्यात आली. इन्फोसिस कन्सल्टंट्स नावाची ही आयटी कंपनी पुण्यातून सुरू झाली.

घरालाच बनवले कार्यालय

कंपनी सुरु करण्यापुरते भांडवलही त्या वेळी नारायण मूर्ती यांच्याकडे नव्हते. कसबस पत्नीकडून पैसे उसनवार घेत या कंपनीची स्थापना करण्यात आली. नारायण मूर्ती यांच्या घरातील एका खोलीलाच कार्यालय बनवले. नारायण मूर्ती या कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असले तरी, ते इन्फोसिसचे पहिले कर्मचारी नाहीत. याचे कारण म्हणजे, इन्फोसिस लाँच झाल्यानंतर एक वर्षानंतर ते अधिकृतपणे त्यात सामील झाले होते. ते रुजू होण्यापूर्वीच तीन जण इन्फोसिसचे कर्मचारी झाले होते.

दोन वर्षांपासून संगणक नव्हता

इन्फोसिस ही आजच्या काळातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने आयकर भरण्यासाठी नवीन पोर्टल तयार केले आहे. मात्र, कंपनी सुरू झाली तेव्हा या कंपनीकडे स्वत:चा एकही संगणक नव्हता. सुमारे 2 वर्षे, कंपनीने संगणकाशिवाय काम केले. 1983 मध्ये, इन्फोसिसने ‘डेटा जनरल 32 बिट MV800’ मॉडेलचे पहिली संगणक प्रणाली विकत घेतली. त्यावेळी इन्फोसिसच्या आयपीओला योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता.

1993 मध्ये शेअर बाजारात प्रवेश

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की इन्फोसिसचा IPO गुंतवणूकदारांना फारसा आवडला नाही आणि त्याला 13 टक्के इतके कमी सबस्क्रिप्शन मिळाले. तेव्हा इन्फोसिसच्या शेअर्सची किंमत फक्त 95 रुपये होती. आजच्या काळात इन्फोसिसच्या एका शेअरची किंमत 1,748.65 रुपये आहे. त्यावेळी जर एखाद्याने साडेनऊ हजार गुंतवून इन्फोसिसचे फक्त 100 शेअर्स घेतले असते तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आज सुमारे 17.50 लाख रुपये इतके राहिले असते.

संबंधित बातम्या

मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; Bank of Baroda कडून संपत्तीचा लीलाव, खरेदीसाठी कर्जही मिळणार

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.