Income Tax : ITR फाईल करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलणार? कारण तरी काय

| Updated on: Jul 20, 2023 | 3:04 PM

Income Tax : आयटीआर फाईल करण्यासाठी आता अवघे दहा दिवस उरले आहेत. पण ही अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी महसूल सचिवांनी मुदत वाढ देण्यास नकार दिला होता. पण या कारणामुळे मुदत वाढ होण्याची शक्यता आहे. कोणते आहे कारण..

Income Tax : ITR फाईल करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलणार? कारण तरी काय
Follow us on

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष (Assessment Year) 2023-24 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 ही आहे. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख अगदी जवळ आली आहे. कर श्रेणीत येणाऱ्या सर्वांना 31 जुलैपूर्वी आयटीआर दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे. अंतिम मुदतीपूर्वी ITR फाईल न केल्यास तुमच्या दंडात्माक कारवाई होऊ शकते. काहीजण प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरताना उशीर करतात. 31 जुलैपर्यंत करदाते आर्थिक वर्ष 2022-23 चे रिटर्न भरू शकतात. कर भरणा करण्यास उशीर झाल्यास आयकर विभागाची नोटीस येईल. दंड पण भरावा लागू शकतो. ही अंतिम मुदत (Deadline) वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी महसूल सचिवांनी मुदत वाढ देण्यास नकार दिला होता. पण या कारणामुळे मुदत वाढ होण्याची शक्यता आहे. कोणते आहे कारण..

मुदत वाढीची मागणी

मुसळधार पावसाने उत्तर भारताला झोडपले आहे. आता पश्चिम आणि मध्य भारताला पण पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज, इंटरनेट आणि इतर सोयी-सुविधांवर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आयकर भरण्याची 31 जुलै, 2023 ही अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

संघटनांनी केली ही मागणी

देशातील कर व्यावसायिकांची सर्वात जुनी आणि मोठ संस्था सेल्स टॅक्स बार असोसिएशनने याविषयी मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या संस्थेने पत्र लिहिले आहे. सध्या देशाची राजधानी दिल्लीत पूर आलेला आहे. त्यामुळे आयकर खात्यासह इतर अनेक कार्यालयांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. अनेक करदाते या शेवटच्या टप्प्यात कर भरतात. अनेक ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. इंटरनेट कोलमडले आहे. त्याचा फटका करदात्यांना बसला आहे. त्यामुळे आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

एका महिन्यांची मुदतवाढ

मोठ्या प्रमाणावर करदाते मुदतीत टॅक रिटर्न फाईल करण्यास असमर्थ आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना संबंधित कागदपत्रे दाखल करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे कर भरणा करण्यास मुदत वाढीची मागणी करण्यात आली आहे. एक महिना मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत मुदत वाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे.

यापूर्वी नकार

आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुटसूटीत आणि सोपी असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तात्काळ करदात्यांनी आयटीआर भरण्याचे आवाहन महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी केले. आयटीआर भरण्यासाठी अर्थ मंत्रालय कोणती पण मुदतवाढ देणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

गेल्यावर्षीची स्थिती

गेल्यावर्षी 31 जुलै पर्यंत जवळपास 5.83 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न दाखल केले होते. मुल्यांकन वर्ष 2022-23 साठी आयटी रिटर्न दाखल करण्याची ती अंतिम तारीख होती.