नवी दिल्ली : जर तुम्हीही ESI च्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला ही ESI हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतो. देशभरात 150 हून अधिक ईएसआयसी हॉस्पिटल (ESIC Hospital) आहेत. या ठिकाणी जवळपास सर्वच आजारापणावर उपचार होतो. ईएसआयचा फायदा या कर्मचाऱ्यांना मिळतो.
ज्या व्यक्तीचे वेतन 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना हा फायदा मिळतो. शारिरीक अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी वेतनाची ही मर्यादा 25000 रुपये महिना आहे. ईएसआयसी प्रिमियमसाठी कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांकडून योगदान देण्यात येते.
यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 1.75 टक्के तर नियोक्त्याकडून कर्मचारी वेतनाच्या 4.75 टक्के योगदान देण्यात येते. त्याआधारे कर्मचाऱ्याला मोफत उपचाराची सुविधा मिळते.
मोफत उपचाराची सुविधा केवळ कर्मचारीच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही मिळते. मोफत उपचाराची सुविधा ठराविक आजारावरच लागू असते असे नाही. तसेच उपचार खर्चाची अधिकत्तम मर्यादाही निश्चित करण्यात आलेली नाही.
मेडिकल इन्शुरन्समध्ये मात्र तुम्हाला अनेक सोयी-सुविधा मिळतात. त्यात कुठलीही आडकाठी नसते. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही या योजनेतंर्गत मोफत उपचाराची सुविधा प्राप्त होते.
सेवानिवृत्त कर्मचारी आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या व्यक्ती, त्याचे कुटुंबिय यांना दरवर्षी 120 रुपयांच्या प्रिमियमवर उपचाराची सुविधा प्राप्त होते. यामध्ये विमाधारक व्यक्तीला आजारपण काळात 91 दिवसांची पगारी सुट्टी मिळते.
ईएसआयच्या माध्यमातून मातृत्वासाठीही सुट्टी मिळते. या सुविधेतून महिला कर्मचारी प्रसुतीसाठी 26 आठवड्यांची सुट्टी घेऊ शकते. तर गर्भपाताच्या स्थितीत सहा आठवड्यांपर्यंत सरासरी वेतनाचा संपूर्ण लाभ देण्यात येतो.
विमाधारक व्यक्तीचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास 10 हजार रुपये ईएसआयसीकडून देण्यात येतात. तर त्याच्यावरील अवलंबून असलेल्या व्यक्तीला पेन्शनचा लाभ मिळतो. त्याच्या वारसदाराला बेरोजगारी भत्ता, पेन्शन, निवृत्तीनंतर मोफत उपचाराचे लाभ मिळतात.