Home Insurance : भूंकपात झाले मोठे नुकसान, अशी मिळेल भरपाई, करावे लागेल हे काम

Home Insurance : सध्या भूंकपाची भीती आहे. उत्तर भारताला भूकंपाने धक्का दिला. त्यामुळे भूकंपात आर्थिक नुकसान झाले. घराची पडझड झाली. सामानाचे नुकसान झाले तर तुम्हाला भरपाई मिळू शकते. आर्थिक सहाय मिळू शकते.

Home Insurance : भूंकपात झाले मोठे नुकसान, अशी मिळेल भरपाई, करावे लागेल हे काम
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 9:00 PM

नवी दिल्ली : सध्या भूंकपाची (Earthquake) भीती आहे. उत्तर भारताला भूकंपाने धक्का दिला. त्यामुळे भूकंपात आर्थिक नुकसान झाले. घराची पडझड झाली. सामानाचे नुकसान झाले तर तुम्हाला भरपाई मिळू शकते. आर्थिक सहाय मिळू शकते. कष्टाने उभारलेले घर क्षणात जमीनदोस्त झाल्यावर ते उभे करणे सोपं काम नाही. कारण या घरासाठीच तुम्ही मोठा कर्जाचा डोंगर उभा केला होता. तो फेडत तुम्ही घर उभे केले आणि अचानक घर कोसळल्यावर तुम्हाला आर्थिक मदतीचा हात हवा असतो. त्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे? तर तुमच्याकडे गृह विमा (Home Insurance) असेल तर अशी आर्थिक मदत मिळू शकते.

विम्याचे संरक्षण

विम्याचे संरक्षण घेतल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. होम इन्शुरन्स ही एक विमा पॉलिसी आहे. या योजनेत घर, तुमची संपत्ती, सामानाचे नुकसान यांची भरपाई या योजनेतून मिळते. ही विमा योजना इतर विमा योजनांसारखीच एक योजना आहे. गृह विमा हा घराच्या मालकाचा विमा म्हणून ओळखल्या जातो. तुमचा बंगला, अपार्टमेंट, भाड्याचा फ्लॅट, स्वतःच्या मालकीचे घर यांचे संरक्षण करण्यासाठी ही विमा योजना आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना, नैसर्गिक आपत्तीत तुमच्या घराचे नुकसान झाल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान भरपाई मिळेल.

हे सुद्धा वाचा

काय काय होते कव्हर

होम इन्शुरन्सच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळते. वादळ, मोठी गारपीट, आग, वीज, महापूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तीत तुम्हाला आर्थिक सहाय मिळते. तर काही प्रकरणात Act of God च्या अंतर्गत संरक्षण मिळत नाही. त्यातही नुकसान भरपाईचा दावा करता येत नाही. पण काही कंपन्या त्यात सूट, सवलत देतात. त्याचा विमाधारकांना मोठा फायदा होऊ शकतो.

विम्याचा दावा

याशिवाय होम इन्शुरन्समुळे दंगल, चोरी, तोडफोड किंवा मालमत्तेची नासधूस होत असेल. रेल्वे किंवा रस्त्याच्या बांधकामामुळे नुकसान झाले असेल. विमानाची किंवा कोणत्याही वाहनामुळे, स्फोटामुळे, आगीमुळे घराचे नुकसान झाले असेल तर गृह विम्याचा दावा करता येऊ शकतो. तर काही गृह विमा योजना घरातील सामान, वस्तूंना संरक्षण देतात. प्रत्येक कंपन्यांचे गृह विम्यांनुसार संरक्षण मिळते. ते प्रत्येक पॉलिसीनुसार वेगवेगळे असते

विम्याचे कवच प्रत्येकाला हवे असते. पण गरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला एवढंच नाहीतर अनेक मध्यमवर्गीय लोकांनाही विमा घेणे परवडत नाही. त्यामागे विम्याच्या जादा हप्त्याचे (Insurance premium) कारण असते. जास्त प्रिमियममुळे अनेकांना इच्छा असूनही विमा पॉलिसी खरेदी करता येते नाही. पण आज तुमच्यासाठी खुशखबरी आहे. लवकरच सरकार एजंटचे कमिशन निश्चित करणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कमिशनवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळ सर्वसामान्य व्यक्तीलाही विमा संरक्षण मिळेल. त्यालाही स्वस्तात विमा खरेदी करता येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.