Home Loan : लाखो कर्जदारांनी निवडला सायलंट किलर! आता निवृत्तीनंतर ही फेडा कर्जाचे हफ्ते

Home Loan : कोरोना काळात अनेकांनी स्वस्तात कर्ज मिळत असल्याने घर खरेदी केले. पण दोन वर्षानंतर आता ईएमआयच्या हप्त्यात झालेली वाढ डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हे कर्ज ग्राहकांसाठी सायलन्ट किलर ठरले आहे.

Home Loan : लाखो कर्जदारांनी निवडला सायलंट किलर! आता निवृत्तीनंतर ही फेडा कर्जाचे हफ्ते
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 7:23 PM

नवी दिल्ली : नोकरदार वर्ग असो वा इतर सर्वसामान्य नागरीक असो, घराचे स्वप्न बँकेच्या गृहकर्जानेच (Home Loan) पूर्ण होते. पण गेल्या वर्षभरात व्याज दरांनी (Interest Rate) जी रॉकेट भरारी घेतली आहे. त्यावरुन हे स्वप्न आता सर्वसामान्यांसाठी प्रचंड महागडे ठरल्याचे दिसून येत आहे. ईएमआयमध्ये (EMI) कमाल वाढ झाली आहे. अनेकांच्या महिन्याचे आर्थिक बजेट त्यामुळे कोलमडले आहे. कर्जाचा हप्ता फेडता फेडता त्यांचे नाकी नऊ आले आहेत. काहींना कर्जाचा कालावधी वाढवून घेतला आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता तर कमी झालाच आहे, पण कालावधी वाढला आहे. परिणामी हे गृहकर्ज देशातील कोट्यवधी कर्जदारांसाठी सायलेंट किलर ठरत आहे.

इतका वाढला ईएमआय

मध्यमवर्ग कर्ज घेऊन घराचं स्वप्न साकारतो. 20 ते 30 वर्षांसाठी हे कर्ज घेण्यात येते. नोकरीच्या कालावधीत हे कर्ज सहज फेडता येईल, असा त्यामागील व्होरा असतो. पण वाढलेल्या ईएमआयमुळे आता या स्वप्नाला सुरुंग लागला आहे. गेल्या वर्षभरापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याजदरात जी वाढ केली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. गृहकर्जावरील व्याजदर 6.5 टक्क्यांहून वाढून 9.5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. बँका व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. त्यामुळे ईएमआय वाढत असेल तर त्याची तरतूद करण्यासाठी काही तरी उपाय शोधणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

कालावधीत वाढ

मध्यमवर्गाने मोठ्या आशेने स्वस्तात कर्ज मिळवले होते. पण महागाई आणि आरबीआयच्या धोरणामुळे त्यावर पाणी फेरले. महागाईवर उतारा म्हणून सातत्याने रेपो दरात वाढ होत आहे. परिणामी बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. गेल्यावर्षी कर्ज 6.5 ते 7% या व्याजदराने मिळत होते. आता हेच व्याजदर 9.5 टक्के ते 10 टक्क्यांदरम्यान पोहचले आहे. काही बँकांनी ग्राहकांचा ईएमआय वाढवला नाही तर कर्जाचा कालावधी वाढवला आहे. त्यांनी दोन वर्षे कर्जाचा कालावधी वाढवला आहे. म्हणजे ज्यांनी 20 ते 30 वर्षांसाठी हे कर्ज घेतले. ते आता 22 किंवा 32 वर्षांपर्यंत वाढले आहे. म्हणजे ज्यांनी उशीरा कर्ज घेतले, ते निवृत्त झाल्यानंतर ही कर्जाचा हप्ता फेडत राहतील.

फ्लोटिंग रेट्सची डोकेदुखी

एक वर्षापूर्वी घर खरेदी करणे सोपे होते. त्यावेळी व्याजदर 6. 5% होते, पण गेल्या 10 महिन्यात गृहकर्जाच्या व्याजदरात दरवाढ झाली. आता हे व्याजदर 9% आणि त्यापेक्षा अधिक झाले आहे. फ्लोटिंग रेटनुसार गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. व्याज दर जसे वाढत आहेत, तसा त्यांचा ईएमआय वाढत आहे. वाढत्या व्याजदरामुळे नवीन घर खरेदीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसल्याने घर खरेदी मंदावली आहे.

तातडीने उपाय शोधा

  1. गृहकर्जाचे ओझे कमी करण्यासाठी तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे
  2. ज्या बँकेत व्याजदर कमी असेल, त्याठिकाणी तमचे गृहकर्ज हस्तांतरीत करा
  3. गृहकर्जाची मूळ रक्कम जमा केल्यास कर्जाचा हप्ता अजून कमी होईल
  4. बँकेतील अधिकाऱ्यांशी थेट बोला, त्यामुले व्याजदर कमी होण्याचा उपाय निघू शकतो.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.