Post Office Scheme : योजना सरकारी, बक्कळ कमाई महिनेवारी

Post Office Scheme : शेअर बाजारातूनच बक्कळ कमाई होते असे नाही, पोस्टाच्या या योजनेत गुंतवणुकीच्या हमीसह चांगला परतावा मिळतो.

Post Office Scheme : योजना सरकारी, बक्कळ कमाई महिनेवारी
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 8:35 PM

नवी दिल्ली : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर अनेक योजना बाजारात आहेत. पोस्ट कार्यालयाच्या (Post Office Investment Scheme) अनेक योजनेत गुंतवणुकीवर हमी तर मिळतेच पण जोरदार परतावा पण मिळतो. केंद्र सरकार अनेक बचत योजना चालविते. यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरीक बचत योजना आणि किसान विकास पत्र या योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे केंद्र सरकार (Central Government) या बचत, गुंतवणूक योजनांची हमी घेते. म्हणजे तुमचा पैसा बुडत नाही.

महिन्याला फायदा केंद्र सरकारद्वारे चालविली जाणारी बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एक निश्चित मासिक उत्पन्न मिळते. ही योजना पोस्टाद्वारे चालविल्या जाते. राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना देशभरातील सर्व टपाल खात्यात उपलब्ध आहे. ही टपाल खात्याची सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेला POMIS असे नाव आहे. या बचत योजनेत कुठलीच जोखीम नाही. योजनेत निश्चित व्याजदर मिळते. गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला कमाईचे साधन उपलब्ध होते.

या योजनेचे वैशिष्ट्ये

हे सुद्धा वाचा
  1. टपाल खात्याच्या मासिक उत्पन्न योजनेत कमीतकमी 1000 रुपये आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करता येते
  2. एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकता
  3. एकल, संयुक्त खात्यातंर्गत गुंतवणुकीच्या मर्यादेनुसार एखाद्या व्यक्तीला दोन्ही खात्यात गुंतवणूक करता येते
  4. पालक, मुलाच्या नावे, नाबालिक, दिव्यांग, मानसिकृष्ट्या कमकुवत बालकाच्या नावे खाते उघडू शकते
  5. एका वर्षानंतर आणि तीन वर्षांच्या पूर्वी खाते बंद करण्याची परवानगी मिळते
  6. कालावधी पूर्ण होण्याअगोदर खाते बंद केल्यास 2% दंड बसतो
  7. सुरुवातीच्या जमा रक्कमेवर 1% दंड सोसावा लागू शकतो
  8. संयुक्त खात्यातील सभासद गुंतवणुकीसोबतच परताव्यात समान वाटेकरी असतात
  9. एका व्यक्तीला विविध खात्यात 9 लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करता येते नाही
  10. पालक त्याच्या मुलांच्या नावे काढत असलेल्या खात्याची मर्यादा स्वतंत्र गृहीत धरण्यात येईल

व्याज किती मिळेल

  1. खाते उघडल्यापासून मॅच्युरिटीपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटी व्याजाची रक्कम जमा करण्यात येईल
  2. खातेदाराने व्याजाची रक्कम स्वीकारली नाही, तर या व्याजाच्या रक्कमेवर व्याज देय नाही
  3. 1 एप्रिल, 2023 ते 30 जून, 2023 पर्यत प्रत्येक वर्षाला 7.4% व्याज मिळेल. हे व्याज दर महिन्याला मिळेल

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.