Gold Silver Price Today News | आज सोमवारी स्वातंत्र्यदिनी सोन्यात कुठलीही वाढ झालेली नाही. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर स्थिर आहेत. शुक्रवार आणि शनिवारी सोन्याने अनुक्रमे 400, 440 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर काल रविवारीही भावात कुठलीही वाढ झाली नाही. सराफा बाजारात सोन्याच्या दरात(Gold Rate Today) यापूर्वी 840 रुपयांची वाढ झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (American Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,750 रुपये होता, सोमवारी हाच भाव 10 ग्रॅमसाठी 48,150 रुपये आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,530 रुपये मोजावे लागणार आहे. चांदी सोमवारी 59,300 रुपये आहे. रविवारी हाच भाव 58,500 रुपये प्रति किलो रुपये (Silver Price Today) होता.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,150 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,530 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 593 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.
18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.