Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीचे दर स्थिर, आजचे भाव माहिती आहेत का?

Gold Silver Price Today News | रविवारी, सोन्याच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. आज भाव स्थिर आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. 

Gold Silver Price Today News | सोन्या-चांदीचे दर स्थिर, आजचे भाव माहिती आहेत का?
आजचे सोने-चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 12:16 PM

Gold Silver Price Today News | रविवारी, 28 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात (Gold Silver Price Today News) कसालाही बदल झाला नाही. सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहेत. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली. 24 ऑगस्टनंतर सोन्याचे दर सातत्याने वाढले. तर चांदीही चमकली. भावात जवळपास 1000 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे खरेदीदारांचा(Gold Investor) उत्साह मावळला होता. पण शुक्रवारनंतर पुन्हा दरात घसरण झाली तर रविवारी, भावात कुठलाही बदल झाला नाही. शुक्रवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,650 रुपये होता. आज 47,300 रुपयांचा दर आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,980 रुपये होता. आज हा दर 51,600 रुपये आहे. शुक्रवारी चांदी प्रति किलो 55,400 रुपये होती. तर आज 54,800 रुपये भाव आहे. त्यामुळे सुट्टीच्या(Holiday) दिवशी सोने-चांदी खरेदी करायचे असेल तर हा चांगला मुहूर्त आहे.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,600 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,330 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,630 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,330 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,630 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,330 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,630 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 548 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे सुद्धा वाचा

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.