Gold Loans : सोने सूसाट, पण कर्जदार का झालेत बेहाल

Gold Loans : सोने नवनवीन रेकॉर्ड करत असले तरी, सोन्यावरील कर्ज घेणाऱ्यांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही, त्यांना उलट तोटा झाला आहे, यामागील कारण तरी काय

Gold Loans : सोने सूसाट, पण कर्जदार का झालेत बेहाल
तर बसेल फटका
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 6:27 PM

नवी दिल्ली : देशात सोन्याने 61 हजार रुपयांच्या घरात पोहचले आहे. पण त्याचा फायदा गोल्ड लोन (Gold Loan) घेणाऱ्यांना काहीच झाला नाही. उलट त्यांना नुकसान झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे होणे शक्यच नाही. सोने विक्रम मोडीत काढत असताना कर्जदारांना (Borrowers) त्याचा नक्की फायदा होत असेल असे वाटणे स्वाभाविक आहे. सोन्याच्या मूल्या आधारे अधिक कर्ज मिळेल असे वाटत असेल तर ही चूक ठरेल. ग्राहकांना या दरवाढीचा कर्ज घेताना कोणता ही फायदा झाला नाही.  सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असताना सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांना याचा का बरं फायदा होत नसेल, काय कारण असेल?

काय आहे कारण सोन्याच्या किंमती गेल्या सहा महिन्यात जवळपास 11 हजारांनी वाढल्या आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. यंदा जानेवारी ते मार्च महिन्या दरम्यान सोन्याने गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा दिला आहे. पण सोन्यावर कर्ज घेताना त्याचा फायदा होत नाही. कारण किंमतीत तेजी आल्यापासून बँका आणि NBFC ने लोन टू व्हॅल्यू रेशो (LTV) कमी केला. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर ही ग्राहकांना कमी कर्ज मिळत आहे.

काय असते लोन टू व्हॅल्यू रेशो लोन टू व्हॅल्यू रेशो (LTV) आधारेच कर्ज देण्यात येते. सोन्याच्या मूल्याआधारे कर्जाची रक्कम निश्चित करण्यात येते. गोल्ड लोन मध्ये या रेशो आधारेच बँका आणि एनबीएफसी कोणत्याही व्यक्ती कर्जाची रक्कम देतात. कोरोना महामारीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोल्ड लोनचा एलटीव्ही रेशो 75 हून 90 टक्के केला होता. आरबीआयने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल टाकले होते. या वाढीनंतर कर्जदारांना सोन्याच्या किंमतीवर 90 टक्के कर्जाची रक्कम निश्चित होत होती.

हे सुद्धा वाचा

आता एलटीव्ही केला कमी सध्या सोन्याच्या किंमती रेकॉर्डस्तरावर आहेत. सोने प्रचंड महाग झाले आहेत. त्यामुळे बरेच ग्राहक गरजा भागविण्यासाठी सोन्यावर कर्ज घेत आहेत. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या मोबदल्यात सोन्यावरील कर्ज स्वस्त आणि सहजरित्या मिळते. निम शहरी आणि ग्रामीण भागात सोने तारण ठेऊन मिळणारे कर्ज लोकप्रिय आहे. सध्या सोन्याच्या किंमती अधिक असतानाही ग्राहकांना या दरवाढीचा फायदा मिळताना दिसत नाही. कारण बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी एलटीव्ही कमी केला आहे.

कारण तरी काय बँका आणि वित्तीय संस्थांना सोने ज्या गतीने आगेकूच करत आहेत, त्याच गतीने ते माघारी फिरेल असे वाटत आहे. म्हणजे सध्या सोन्याची जी वाढ आहे ती एक फुगवटा असल्याची भीती बँकांसह वित्तीय संस्थाना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी एलटीव्ही 90 टक्क्यांहून कमी करण्यात आला आहे. 90 टक्क्यांआधारे कर्ज दिल्यास आणि भावात पुन्हा घसरण झाल्यास कर्ज बुडण्याची भीती बँकांना वाटत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.