2000 note exchange : आजपासून बदला 2000 रुपयांची नोट, पण त्यापूर्वी जाणून घ्या हे महत्वाचे मुद्दे

2000 note exchange : आजपासून 2000 रुपयांची नोट बदलता येणार आहे. पण त्यापूर्वी बदलांची ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा...

2000 note exchange : आजपासून बदला 2000 रुपयांची नोट, पण त्यापूर्वी जाणून घ्या हे महत्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 9:51 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी, 19 मे 2023 रोजी मोदी सरकारच्या कार्यकाळातील नोटबंदी 2.0 जाहीर केली. त्यातंर्गत 2,000 रुपयांची नोट माघारी बोलविण्यात आली. केंद्रीय बँकेने सर्व नागरिकांना, 2,000 रुपयांच्या नोटा (2000 Rupees Note) बदलण्यास अथवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहिल. बँक खात्यात विना अडथळा या गुलाबी नोटा बदलता येतील. अथवा नागरिक त्यांच्या खात्यात जमा करु शकतील. आज, 23 मेपासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. या नोटा बदलताना फारसा त्रास होणार नाही, तसेच यासाठी मोठा कालावधी असल्याने बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन आरबीआने नागरिकांना केले आहे. तरीही नागरिकांच्या मनात काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरे शोधुयात

1. गुलाबी नोटा का मागे घेण्यात येत आहेत 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारच्या काळातील पहिली नोटबंदी लागू करण्यात आली होती. अर्थव्यवस्थेतील चलनाचा तुटवडा दूर करण्यासाठी 2000 रुपयांची नोट सुरु करण्यात आली. देशात डिजिटल व्यवहार वाढले आहेत. या नोटांचा उद्देश पूर्ण झाला आहे. इतर चलन मुबलक प्रमाणात आहे. 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात कमी आहे. 2019 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. आता या नोटा माघारी बोलविण्यात येत आहे.

2. काय आहे क्लीन नोट पॉलिसी नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नोटा देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा माघारी बोलविण्यात येत आहे. गुलाबी नोटांच्या दर्जावर यापूर्वी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत नोटा माघारी बोलविण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा

3. गुलाबी नोटांची वैधता कायम आहे का आरबीआयने सातत्याने सांगितले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा परत मागविण्यात येत असल्या तरी, त्यांची वैधता, लीगल टेंडर कायम राहिल. चर्चेनुसार, पुढील चार महिने अथवा दुसरा आदेश येईपर्यंत ही वैधता कायम असेल.

4. 2000 रुपयांची नोट व्यवहारात वापरता येईल का? RBI ने स्पष्ट केल्यानुसार, नागरिकांना ही नोट व्यवहारात, खरेदी-विक्रीसाठी वापरता येईल. तिचे सार्वजनिक व्यवहारातील महत्व अजूनही अबाधित आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपूर्वी 2000 रुपयांची खात्यात जमा करता येतील.

5. तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर काय करावे देशातील नागरिकांना या नोटा खात्यात जमा करता येतील, अथवा त्या बदलवीता येतील. नोट एक्सचेंज करण्यासाठी ही सुविधा 30 सप्टेंबरपर्यंत असेल. सार्वजनिक बँका, व्यावसायिक माध्यम केंद्र आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलविता येतील.

6. मग मर्यादा काय आहे आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

7. व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील बँकांच्या व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील, असा एक सवाल विचारण्यात येतो. तर या बिझनेस करस्पॉन्डेंट सेंटरवर खातेदाराला 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलविता येतील.

8. बँकेचे खाते नसेल तर काय करावे बँकेचे खाते नसेल तरीही तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील. त्यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एका दिवशी 20,000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील.

9. खात्यात जमा करता येतील कितीही 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करायच्या असतील तर, त्याची कोणतीच मर्यादा नाही. तुम्हाला खात्यात किती ही नोटा जमा करता येतील. पण त्यासाठी बँकेशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल.

10.तर पॅनकार्ड दाखवा 50,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्ड दाखवावे लागेल आणि त्याचा तपशील द्यावा लागेल. नियमानुसार, एका मर्यादेपेक्षा अधिकची रोख जमा केल्यास बँका शुल्क आकारतील.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.