Railway : पडला का बुचकाळ्यात! उशीरा रात्री स्टेशनवर उतरुन थांबल्यास, घ्यावे लागते का प्लॅटफॉर्म तिकीट

Railway : रात्री उशीरा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागले आणि सकाळपर्यंत थांबायचे असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते का? काय आहे नियम..

Railway : पडला का बुचकाळ्यात! उशीरा रात्री स्टेशनवर उतरुन थांबल्यास, घ्यावे लागते का प्लॅटफॉर्म तिकीट
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 7:26 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही रेल्वेतून प्रवास (Railway Journey) करत नसाल. मित्राला, नातेवाईकांना सोडायला रेल्वे स्थानकावर आले असाल, तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते. रेल्वे बोर्डानुसार, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणे अनिवार्य आहे. विना प्लॅटफॉर्म तिकीट तुम्हाला दंड होऊ शकतो. त्यासाठी दंड द्यावा लागतो. पण एखादा प्रवासी मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर उतरत असेल आणि त्याला घरी जाण्यासाठी त्यावेळी दुसरे साधन नसेल आणि तो सकाळपर्यंत रेल्वे स्थानकात थांबणार असेल तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) खरेदी करावे लागते का?

कारण काय प्रत्येक दिवशी लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यांना त्यांच्या गंतव्य, इच्छित स्थानकावर उतरायचे असते. पण अनेकवेळा वाहतूक साधनांची कमी, सुरक्षेची कारणे आणि थकव्यानंतर रात्रभर आरामाची सवय या कारणामुळे प्रवाशी सकाळीच रेल्वे स्थानक सोडण्याच्या मानसिकतेत असतात. त्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म तिकीटाची आवश्यकता असते का असा प्रश्न अनेकांना पडतो.

प्रवास संपल्यानंतर स्टेशनवर थांबावे का भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ते एका स्थानावरुन दुसऱ्या ठिकाणी जातात. काही प्रवासी दुरचा पल्ला तुटक तुटक गाठतात. एका स्टेशनवर उतरुन दुसऱ्या ठिकाणी त्यांना रेल्वेने जायचे असते. त्यासाठी त्यांना दुसऱ्या रेल्वेची वाट पाहत थांबावे लागते.

हे सुद्धा वाचा

वेटिंग रुमची व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने वेटिंग रुमची, प्रतिक्षालयांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी प्रवाशांना काही वेळ थांबता येते. अनेकदा मध्यरात्री आलेले प्रवाशी सुरक्षेच्या कारणाने अथवा योग्य वाहतूक साधन नसल्याने रात्री वेटिंग रुममध्येच थांबण्याचा निर्णय घेतात. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा निर्णय योग्य ठरतो. या वेटिंग रुमचा त्यांना रात्री आधार असतो. या ठिकाणी रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त असतो.

प्लॅटफॉर्म तिकीट गरजेचे आहे का समजा एखादा प्रवासी मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर उतरला आणि त्याला रात्रभर स्टेशनवर थांबून सकाळी जायचं असेल तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते का, तर याचे उत्तर नाही असे आहे. अशा प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट घेण्याची गरज नाही. पण त्याच्याकडे त्याने केलेल्या प्रवासाचे तिकीट असणे आवश्यक आहे. गरज पडल्यास तिकीट तपासणीस अथवा इतर अधिकाऱ्यांना त्यांना हे तिकीट दाखविता येईल. प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर पुढील दोन तास वैध असते. प्लॅटफॉर्म तिकीटाचे शुल्क प्रत्येक रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे असते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.