नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market) अनेक कंपन्यांचे तिमाही परिणाम (Quarterly Result) दिसून येत आहे. कंपन्यांनी नफा कमविल्याचा परिणाम बाजारातही दिसून येत आहे. शेअर बाजारात हे शेअर (Stocks) शानदार कामगिरी करत आहेत. अनेक शेअर्स जोरदार प्रदर्शन करत आहेत. त्यातीलच एका शेअरने गुंतवणूकदारांना (Investors) मालामाल केले आहे..
अमारा राजा बँटरीज या कंपनीचे तिमाही निकाल आले आहेत. कंपनीने जोरदार कमाई केल्याने, बाजारातही चांगले प्रदर्शन दिसून आले. या स्टॉकने गुंतवणूकदारांना अवघ्या काही तासात मालामाल केले.
या कंपनीने गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या सत्रातील एका तासातच जोरदार परतावा दिला. कंपनीने 11 टक्क्यांचा परतावा दिला. म्हणजे अवघ्या एका तासात गुंतवणूकदार कमाईदार झाले. कंपनीने FD पेक्षाही एका तासात गुंतवणूकदारांना परतावा दिला.
ही कंपनी ऑटो बँटरी सेक्टरमध्ये काम करते. पहिल्या व्यापारी सत्रात कंपनीचा स्टॉक 520 अंकांवरुन 580 अंकावर पोहचले. कंपनीने एका तासाता दहा टक्क्यांहून अधिकचा उच्चस्तर कायम ठेवला.
या स्टॉकचा उच्चस्तर 713 तर या वर्षातील निच्चांकी कामगिरी 438 अंक ही आहे. हा स्टॉक आज 597 पर्यंत स्तर गाठण्याची शक्यता आहे. हा त्याचा अप्पर बँड आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज कमाईची मोठी संधी आहे.
या कंपनीचे बाजारातील एकूण मूल्य 10 हजार कोटी रुपये आहे. या स्टॉकने गेल्या महिन्यात 493 अंकाहून 580 अंकापर्यंत मजल मारली आहे. या शेअरबाबत बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया असल्याने त्याचा फायदा शेअरला मिळेल.
या शेअरवर गुंतवणूकदार एवढे फिदा झाले आहेत की, आजच्या पहिल्या सत्रात आणि काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी सुरु आहे. पण शेअरची विक्री करण्यात येत नाहीये.
या कंपनीचा नफा 39 टक्क्यांनी वाढला आहे. तर उलाढाल 2264 कोटी रुपयांहून 2700 कोटी रुपये झाला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2.9 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.