Mutual Fund : ये रे ये रे पैसा! शेअर बाजारातून नव्हे तर येथून होईल कमाई

Mutual Fund : गुंतवणुकीतून जोरदार परतावा मिळावा, असे प्रत्येकाला वाटते, पण शेअर बाजार प्रत्येकवेळी साथ देईल, अशी आता स्थिती नाही. पण या ठिकाणी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.

Mutual Fund : ये रे ये रे पैसा! शेअर बाजारातून नव्हे तर येथून होईल कमाई
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) चढउताराचे सत्र सुरु आहे. अमेरिकेवरील दिवाळखोरीचे संकट आणखी गडद झाले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धपातळीवरील बैठकातून काहीच हाती लागलेले नाही. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. काल सकाळपासूनच शेअर बाजाराने लाल झेंडा फडकावला होता. त्यानंतर शेवटच्या सत्रात बाजाराने हिरवा रंग दाखवला. बाजारात काही शेअर सोडले तर इतरांची प्रभावी वाटचाल नाही. त्यामुळे जोखीम कमी, कमाईची हमी, यासाठी तुम्हाला दुसरा चांगला पर्याय निवडावा लागेल.

म्युच्युअल फंड योग्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे होईल. कधी कधी शेअर बाजारात मनजोगा परतावा मिळत नाही. शेअर बाजार गडगडल्याने अनेक लोकांचा पैसा बुडाला आहे. त्यात अनेकांना मोठा फटका झाला आहे. अशावेळी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कामी येईल. शेअर बाजारातील पडझड ही म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ असते. यामध्ये रिस्क पण कमी असते. तुम्हाला इक्विटी फंड, डेट, गोल्ड अशा अनेक प्रकारच्या फंड्समध्ये गुंतवणूक करता येते.

लार्ज कॅप फंड्स फायद्याच बाजारातील तज्ज्ञानुसार, लार्ज कॅप फंडात तुम्ही पैसा गुंतवू शकता. त्यामध्ये आतापर्यंत जोरदार रिटर्न मिळाले आहेत. गुंतवणूकदार मिडकॅप फंडमध्ये पैसा गुंतवू शकतात. इक्विटी फंड ही गुंतवणुकीसाठी योग्य. तर गुंतवणुकीतील काही हिस्सा डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतविता येईल.

हे सुद्धा वाचा

SIP आणि STP फायदेशीर बुडत्या बाजारातून कमाई करण्यासाठी म्युच्युअल फंडात SIP हा चांगला पर्याय आहे. बाजारातील जोखीमेतूनही चांगला परतावा घ्यायचा असेल तर SIP हा चांगला पर्याय ठरेल. बाजारातील जोखीमेआधारेच म्युच्युअल फंडातून कमाई करता येते. बाजारात पडझड होत असताना SIP त वाढ करणे फायदेशीर ठरते, असा तज्ज्ञाचा सल्ला आहे. त्यामुळे तुमची सरासरी वाढते आणि दीर्घकालीन फंडात मोठा परतावा मिळतो. तर STP म्हणजे सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅनमध्ये तुम्हाला एकरक्कमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर हा निधी तुम्ही इक्विटी स्कीम्समध्ये हस्तांतरीत करु शकता.

असे आहे परताव्याचे गणित WhiteOak Capital Mutual Fund ने SIP Analysis Report मध्ये याविषयीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, SIP द्वारे केलेली गुंतवणूकच तुम्हाला अधिकचा फायदा करुन देते. तीन वर्षांकरीता तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला सरासरी 11.9% टक्के परतावा मिळेल. तर एसआयपीद्वारे 5 वर्षांकरीता गुंतवणूक करत असाल तर सरासरी 13% टक्के परतावा सहज मिळेल.

8 आणि 10 वर्षांकरीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर क्रमशः 14.1% आणि 14.2% सरासरीने रिटर्न प्राप्त होईल. यामध्ये सर्वाधिक सरासरी परतावा हा 15 वर्षांकरीता केलेल्या गुंतवणुकीवर मिळाला आहे. 15 वर्षांच्या पुढे केलेली एसआयपी अधिक फायदेशीर ठरते. काही योजना तर 20 ते 22 टक्क्यांपर्यंत परताव्याचा दावा करतात. पण एसआयपीद्वारे कमीत कमी तीन वर्षांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मिड कॅप फंडने सर्वात चांगला परतावा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.