Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Investment : जोखीमीशवाय अधिक रिटर्न्स! शेअर बाजारात नाही, इथं लागली लॉटरी

Gold Investment : शेअर बाजारापेक्षा गुंतवणूकदारांना याठिकाणच्या गुंतवणुकीतून लॉटरी लागली आहे. तुम्ही गुंतवणुकीसाठी निवडला का हा पर्याय...

Gold Investment : जोखीमीशवाय अधिक रिटर्न्स! शेअर बाजारात नाही, इथं लागली लॉटरी
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 7:34 PM

नवी दिल्ली : जादा परताव्यासाठी अर्थातच शेअर बाजार (Share Market) हा अनेकांचा पसंतीचा प्लॅटफॉर्म आहे. ‘रिस्क है तो इश्क है’, असे म्हणत अनेक जण शेअर बाजारात जोखीम घेतात. काहींना फायदा होतो, तर काहींना त्यादिवशापुरते नुकसान सहन करावे लागते. पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांना (Long Term Investment) फायदा होतोच होतो. पण सध्या एका गुंतवणूक पर्यायाने सर्वांचेच डोके चक्रावून टाकले आहे. कोणत्याच रिस्कशिवाय गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना जवळपास 125 टक्क्यांचा रिटर्न (Return) मिळाला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटर्जी बदलण्याचा विचार केला आहे.

सॉव्हरिन गोल्ड बाँड तुम्ही जास्त कमाईच्या विचारात असाल तर सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) तुम्हाला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. सार्वभौम सुवर्ण रोख्यातील गुंतवणुकीतून गेल्या 8 वर्षोंत गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळाला आहे. केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत या सुवर्ण रोख्याची अनेक हप्ते जारी केले आहेत. नोव्हेंबर 2015 पासून या गुंतवणुकीतून वार्षिक 13.7 टक्के रिटर्न मिळाले. आर्थिक नियोजनाचा सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांनी आठ वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक चढउतार पाहिले. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. देशातील अनेक श्रीमंतांनी आर्थिक नियोजन म्हणून या सुवर्णरोख्यात गुंतवणूक केली आहे.

कॅपिटल गेन टॅक्स गेल्या आठ वर्षात मॅच्युरिटीनंतर कॅपिटल गेन टॅक्स फ्री होत. तर सरकार बाँडच्या मूल्यावर 2.50 टक्के व्याज पण देते. सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या 63 इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 4.68 टक्के ते 51.89 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाला आहे. हा परतावा गुंतवणुकीच्या कालावधीवर निश्चित होतो.

हे सुद्धा वाचा

कधी झाली सुरुवात सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या सवलत मिळते.

ही आहे अट सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.

इतका परतावा या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.

इतके कोटी जमा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.