वाहनांच्या विमा नियमात होणार बदल, सरकार उचलणार हे कठोर पाऊल

वाढते वाहन अपघात आणि वाहनांचा विमा न काढण्याच्या प्रवृत्तीमुळे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकार नविन धोरण आणणार आहे.

वाहनांच्या विमा नियमात होणार बदल, सरकार उचलणार हे कठोर पाऊल
traffic-03Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढला नसेल तर ट्रॅफीक पोलिसांनी तु्म्हाला पकडताच तुमच्या वाहनाचा विमा जागच्या जागी काढण्याचा नियम आणण्याच्या विचारात सरकार आहे. सरकरच्या आकडेवारीनूसार देशात ४० ते ५० टक्के वाहनांचा विमा काढलेला नसल्याने अपघातातील जखमींना नुकसान भरपाई मिळत नसल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तुमच्याकडील वाहनाचा जर विमा उतरला नसेल तर लवकर विमा उतरवा लागेल, अन्यथा सरकार ऑन द स्पॉट विमा उतरविणार आहे.

देशातील पन्नास टक्क्याहून अधिक वाहनांचा विमा काढलेला नसतो, त्यामुळे एखादा अपघात घडल्यास जखमीला उपचारासाठी आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे सरकारने आता नवीन तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानूसार वाहनांचा थर्ड पार्टी विमा काढलेला असणे गरजेचे आहे. परंतू अनेक जण आपल्या वाहनांचा विमा काढत नाहीत. त्यामुळे सरकार वाहनांच्या विमा धोरणात बदल करणार आहे. सरकार आता नविन विमा नियमानूसार पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी एक अशाप्रकारचे मोबाईल एप विकसित करीत आहे की त्याच्या मदतीने हे शक्य होणार आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन एपच्या मदतीने पकडलेल्या वाहनांची संपूर्ण माहीती आता मिळणे सोपे होणार आहे. त्यामुळे जर वाहन चालकाने त्या वाहनाचा विमा काढला नसेल तर वाहनमालकाला विमा खरेदी करण्यासाठी आग्रह केला जाईल. जागच्या जागी अशा वाहनाचा विमा काढला जाईल असे म्हटले जात आहे.

काय असणार प्रक्रिया …..

या प्रक्रीयेत वाहन विमा नसलेल्या चालकांना या विमा पॉलीसीचा हप्ता भरण्यासाठी बॅंकासह विमा कंपन्यांनाही फास्टॅग प्लॅटफॉर्मवर एकत्र आणले जाईल. त्यामुळे फास्टॅगमधून तुमच्या विम्याचा हप्ता कापण्याची योजना आहे. जनरल इंश्योरन्स काऊन्सिलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार या बैठकीत तत्काळ विमा काढण्याच्या योजनेवरही चर्चा झाली. यासंदर्भात नेमके काय नियम आणि अटी ठरवायच्या यावर १७ मार्च रोजी बैठकी निर्णय घेतला जाणार आहे.

किती असतो थर्ड पार्टी विमा…

थर्ड पार्टी विम्यासाठीचा हप्ता वाहनाचा आकार आणि वयोमानानूसार ठरत असतो. १००० सीसी प्रवासी वाहनासाठी २०७२ रूपये, १०००-१५०० सीसी वाहनासाठी ३,२२१ रूपये आणि १५०० सीसी इंजिनासाठी ७,८९० रूपये विमा हप्ता आहे. विमा नियामक संस्था इरडाने विमा कंपन्यांना जप्त वाहनांसाठी अस्थायी किंवा अल्पकालिन मोटर विमा जारी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.