UPI ATM : डेबिट कार्ड ठेवा घरीच, आले की देशातील पहिले युपीआय एटीएम

UPI ATM : देशातील पहिले युपीआय एटीएम आले आहे. डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सूटका होण्यासाठी हे तंत्रज्ञान आता उपयोगी पडणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने हे पाऊल उचलण्यात येत आहे.

UPI ATM : डेबिट कार्ड ठेवा घरीच, आले की देशातील पहिले युपीआय एटीएम
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 7:44 PM

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : भारताने सध्या काही वर्षांपासून फिनटेक सेक्टरमध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर भारत या इंडस्ट्रीमध्ये सर्वात पुढे आहे. युपीआयच्या माध्यमातून भारतात मोठा बदल होत आहे. युपीआय पेमेंटच्या माध्यमातून किरकोळच नाही तर मोठमोठे व्यवहार होत आहे. इतर देशांमध्ये सुद्धा युपीआय वापरासाठी करार करण्यात आला आहे. त्यात आणखी एक पाऊल पुढं टाकण्यात आले आहे. आता व्हाईट-लेबल युपीआय एटीएमचा श्रीगणेशा होत आहे. या सुविधेमुळे कार्डलेस कॅश विड्रॉल म्हणजे विना कार्ड पैसे काढता येतील. त्यासाठी युपीआय एटीएमचा (UPI ATM) फायदा होईल. या सुविधेमुळे डेबिट कार्डचे (Debit Card Fraud) फसवणूक होणार नाही. कारण डेबिट कार्डची पैसे काढण्यासाठी गरज नाही. युपीआय पेमेंटच्या सहायाने रक्कम काढता येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्याने हे पाऊल उचलण्यात येत आहे.

झाला रेकॉर्ड

ऑगस्ट महिन्यात UPI ने उच्चांक गाठला. युपीआय व्यवहार या महिन्यात 10 अब्जाचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. जुलै महिन्यात युपीआय व्यवहाराचा आकडा 9.96 अब्जावर होता. युपीआय, डिजिटल पेमेंटमध्ये महत्वाचा भाग ठरला आहे. झटपट व्यवहारासाठी कोट्यवधी भारतीय युपीआयचा वापर करत आहे.

हे सुद्धा वाचा

या कंपनीचा वाटा

हिताची पेमेंट सर्व्हिसेज, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या नवक्रांतीची सुरुवात होत आहे. त्यामुळे एटीएमवर जाताना तुम्हाला सोबत डेबिट कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुमच्याकडे स्मार्टफोन असला तर तुम्हाला एटीएममधून रक्कम काढता येईल.

कार्ड स्किमिंगचा धोका टळणार?

कार्डलेस कॅश विड्रॉलमुळे कार्ड स्किमिंगचा धोका कमी होईल. यामध्ये डेबिट वा क्रेडिट कार्डचा प्रत्यक्ष वापर होणार नाही. त्यामुळे कार्ड स्किमिंगसारखा फ्रॉड होणार नाही. कार्ड स्किमिंगच्या आधारे एटीएमवर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. डेबिट कार्ड एटीएममध्ये टाकल्यावर सायबर भामटे कार्ड क्रमांक आणि पिन चोरतात आणि खात्यातील रक्कमेवर हात साफ करतात.

कसा होईल फायदा

  1. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अत्याधुनिक मनी स्पॉट युपीआय एटीएमचा वापर झटपट व्यवहारासाठी होणार आहे.
  2. युपीआय एटीएम एंड्राईड ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे. जुन्या व्यवहार प्रक्रियेशी सांगड घालून हे एटीएम काम करतील. क्यूआर कोडच्या सहायाने पुढील व्यवहार पूर्ण होईल.
  3. हिताची पेमेंट सर्व्हिसेज एकमात्र व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर आहे, जे 3,000 हून अधिक एटीएम लोकेशनवर कार्डलेस कॅशची सुविधा उपलब्ध करुन देत आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.