Station : हे एअरपोर्ट नव्हे तर रेल्वेस्टेशन..सुविधा अशा की तोंडात घालाल बोट..
देशातील या रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा इतका बदलणार आहे की, तुम्हाला रेल्वे स्टेशनवर आलो की एअरपोर्टवर असा प्रश्न पडणार आहे..
नवी दिल्ली : देशातील रेल्वे (Railway) लवकरच कात टाकणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) देशातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेलनुसार हा चेहरा मोहरा बदलणार आहे. त्यामुळे तुम्हाला एअरपोर्टवर (Airport) आलो आहोत की रेल्वे स्टेशनवर असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
भारतीय रेल्वे देशातील 16 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास (Redevelopment) करणार आहे. त्यामध्ये दिल्लीतील आनंद विहार, तांबरम, विजयवाडा, दादर, कल्याण, ठाणे, अंधेरी, पुणे, कोयम्बतूर, बेंगळुरु सिटी,चेन्नई , वडोदरा, भोपाळ, हजरत निजामुद्दीन आणि अवादी या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे.
भारतीय रेल्वेच्या योजनेनुसार, या सर्व रेल्वे स्टेशनच्या पूनर्विकासासाठी या आर्थिक वर्षात बोली लावण्यात येऊ शकते. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या रेल्वे स्टेशनला आधुनिक रुपडं देण्यासाठी बदल करण्यात येणार आहे. सूत्रानुसार, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मॉडेलची चाचपणी करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 199 स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंभी अश्विनी वैष्णव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पुनर्विकास करण्यासाठीचे स्टेशनचे डिझाईन, कॅफेटेरिया आणि मनोरंजन सुविधा यांचा समावेश असेल असे सांगितले आहे.
वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 47 स्टेशनच्या विकासासाठी निविदा काढण्यात आली आहे. तर आणखी 32 स्टेशनच्या विकासासाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लवकरात लवकर सुविधा देण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वेने केंद्र सरकारला दिल्ली, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारने तातडीने मंजूरी दिली आहे. त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हे रेल्वेस्टेशन एअरपोर्टपेक्षा ही अत्याधुनिक होतील, असा दावा करण्यात येत आहे.