1 ऑक्टोबरपासून व्यवहारात होणार हे 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार परीणाम, पाहा काय होणार बदल

सप्टेंबर महिना संपत असून एक ऑक्टोबरपासून देशात पाच महत्वाचे नियम बदलणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहेत. तर पाहूयात काय होणार आहेत बदल...

1 ऑक्टोबरपासून व्यवहारात होणार हे 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार परीणाम, पाहा काय होणार बदल
licImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 7:59 PM

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : सप्टेंबपरचा महिना संपत आला आहे. यानंतर एक ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्याच्या दैनंदिन व्यवहारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आपण जर या बदलांना समजून घेतले नाही तर फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पाहूयात 1 ऑक्टोबरपासून काय – काय बदल होणार आहेत. यात टीसीएस, डेबिट-क्रेडीट कार्डचे नवे नियम आणि एलआयसी संबंधित निर्णयाचा समावेश आहे.

टीसीएसवर नवीन दर लागू होतील

स्रोतावर कर संकलन म्हणजेच टॅक्स कलेक्शन एट सोर्स ( टीसीएस ) वर 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन दर लागू होतील. जर तुमचा खर्च एका वित्तीय वर्षांत एक ठराविक सीमेपेक्षा जर जादा असेल तर तुम्हाला टीसीएस भरावा लागेल. मग भलेही तुम्ही परदेश प्रवास करीत असाल किंवा परदेशी इक्वीटीमध्ये गुंतवणूक करीत असाल. काही दिवसांपूर्वी सरकारने या संदर्भात परिपत्रक जारी केले होते. ज्यात म्हटले होते की आर्थिक वर्षात सात लाखाच्या मर्यादेबाहेर खर्च केल्यास 20 टक्के टीसीएस भरावा लागेल. म्हणजेच परदेश प्रवास तुम्हाला महागात पडू शकणार आहे.

डेबिट- क्रेडीट कार्डचा नवा नियम

आरबीआयने डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड वा प्रीपेड कार्डसाठी नेटवर्क निवडण्याची सुविधा दिली आहे. जेव्हा तु्म्ही डेबिट वा क्रेडीट कार्डसाठी अर्ज कराल तेव्हा बॅंकच कार्ड नेटवर्क निवडत होती. 1 ऑक्टोबर 2023 पासून बॅंक आपल्या ग्राहकांना आवडते नेटवर्क निवडण्याची सुविधा देईल.

आयडीबीआय बॅंकेची नवी योजना

आयडीबीआय बॅंकेने एक नवी एफडी योजना सुरु केली आहे. तिचे नाव अमृत महोत्सव एफडी आहे. ही योजना 375 आणि 444 दिवसांची आहे. यात गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे.

बंद एलआयसी चालू करण्याची संधी

जीवन विमा निगम ( एलआयसी ) ने बंद झालेली पॉलिसीला चालू करण्याची सुवर्ण संधी दिली आहे. या बंद पॉलिसींना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरु करता येणार आहे.

दोन हजाराच्या नोटा बंद होणार

जर तुमच्या अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील त्यांना बॅंकेत जमा किंवा बदलण्याची तारीख 30 सप्टेंबर पर्यंतच आहे. आरबीआयने मे महिन्यातच सांगितले होते की 2000 रु.च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. या शिवाय सीएनजी – पीएनजीच्या किंमतीत बदल होऊ शकतो. तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव देखील वाढू शकतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.