थर्ड पार्टी विमा महागणार; एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढणार?, एक जूनपासून होणारे ‘हे’ बदल खिसा रिकामा करणार!

येत्या एक जूनपासून बँकिंग क्षेत्रातील अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. सोबतच वाहनांचा थर्ड पार्टी विमा देखील महागणार आहे. या बदलांचा आर्थिक ताण तुम्हाला जाणवू शकतो. जाणून घेऊयात या नव्या बदलांबाबत

थर्ड पार्टी विमा महागणार; एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढणार?, एक जूनपासून होणारे 'हे' बदल खिसा रिकामा करणार!
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 12:50 PM

मुंबई : एक जूनपासून आर्थिक आणि व्यवसायिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर आणि खिशावर पडणार आहे. एक जूनपासून बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आपल्या चेक पेमेंटच्या पद्धतीमध्ये बदल करणार आहे. यासोबतच वाहनांचा थर्ड पार्टी विमा (Third party insurance) देखील महागणार आहे. एसबीआय बँकेकडून (SBI Bank) होमलोनच्या व्याज दरात वाढ करण्यात येणार असल्याने होम लोन महाग होणार आहे. एक जूनपासून गोल्ड हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. सोबतच अ‍ॅक्सिस बँक आपल्या सेविंग्स खात्याच्या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. इंडियन पोस्ट बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे महाग होणार आहे. सोबतच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. आज आपण एक जूनपासून जे बदल होणार आहेत, त्यबाबत चर्चा करणार आहोत.

गाडीचा थर्ड पार्टी विमा महागणार

एक जूनपासून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह सर्वच वाहनांचा थर्ट पार्टी विमा महागणार आहे. एक जूनपासून तुम्हाला प्रीमियमसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दुचाकी वाहनांसाठी 150 सीसी ते 350 सीसीच्या वाहनांसाठी 1,366 रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. तर 350 सीसीपेक्षा अधिक वाहनांसाठी 2,804 रुपये मोजावे लागणार आहेत.

एसबीआयचे होम लोन महागणार

स्टेट बँक ऑफ इंडिया ‘एसबीआय’ने आपल्या होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट ‘ईबीएलआरमध्ये’ 40 बेसीस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे आता ईबीएलआर 7.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढलेले व्याज दर एक जूनपासून लागू होणार असल्याने गृहकर्ज महाग होणार आहे. गृहकर्ज महाग झाल्याने तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर शुल्क

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने देखील आता आर्थिक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक एक जूनपासून नवे नियम लागू करणार आहे. नव्या नियमानुसार पहिल्या तीन आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतर पैसे जमा करणे किंवा पैसे काढणे तसेच मिनी स्टेटमेंट यासाठी प्रत्येक व्यवहारावर एक ठराविक रक्कम अधिक जीएसटी आकारण्यात येणार आहे.

गॅस सिलिंडरच्या दरात बदल

गॅस पुरवठा कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. एक जून रोजी एलपीजी गॅसचे नवे दर जारी केले जातील. वाढती महागाई पहाता गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालू महिन्यात एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 102 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.