Petrol : या सायकलचा स्वस्तात प्रवास, महागड्या पेट्रोलचा कशाला विचार

Petrol : पेट्रोलच्या वाढलेल्या दराचा फटका सगळ्यांनाच बसत आहे. त्यावर पर्यायही शोधण्यात येत आहे. हा एक पर्याय खास तुमच्यासाठी..

Petrol : या सायकलचा स्वस्तात प्रवास, महागड्या पेट्रोलचा कशाला विचार
वेग असा की वाऱ्याशी भीडाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 12:12 PM

नवी दिल्ली : पेट्रोलच्या किंमती (Petrol Price) गगनाला भिडलेल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. काहीजण ई-व्हेईकलचा (E-Vehicle) पर्याय शोधत आहे. पण ईलेक्ट्रिक बाईकची (Electric Bike) किंमत पाहता, हा पर्याय सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मग त्याहून दुसरा कोणता पर्याय आहे बरं..

पेट्रोल वाहनांना पर्याय म्हणून ग्राहक इलेक्ट्रिक सायकलकडे वळाले आहेत. परिणामी या सायकलची मागणी तेजीत आहे. जर तुम्हीही चांगल्या इलेक्ट्रिक सायकलच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या या सायकलवर एक नजर तर टाका..

हिरो कंपनीने बाजारात चार इलेक्ट्रिक सायकल उतरवल्या आहेत. या सायकल प्रति तास 25 किलोमीटरच्या टॉप स्पीडने धावतात. तर एकदा फुल्ल चार्ज केल्यावर ही सायकल 55 किलोमीटर धावते. त्यामुळे ही सायकल स्वस्त पर्याय म्हणून तुमच्या उपयोगाची ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

हिरो Lectro च्या श्रेणीतील या या सायकल तुम्हाला आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देतात. या सायकलमध्ये 250W BLDC मोटार आहे. ही मोटार सायकलच्या मागच्या चाकांमध्ये असते. त्यामुळे स्पीडने तुमच्या कामाच्या अथवा इच्छुक ठिकाणी पोहचू शकता.

ग्राहकांसाठी ही सायकल दोन रंगात उपलब्ध आहे. या सायकलची बॅटरी फुल चार्ज असल्यास 30km चा स्पीड देते. या सायकलची किंमत 32,999 रुपये आहे.

Hero Lectro C5x ही स्टाईलिश ई-बाईक आहे. मजबूत असल्याने ग्राहकांची ती विशेष पसंतीस उतरली आहे. लिथियम-आयन डिटेचेबल बॅटरी असल्याने ती सहज चार्ज करता येते आणि स्वॅपही करता येते. ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी 3-4 तास लागतात. बॅटरीचे वैशिष्ट्ये म्हणजे तिच्यावर धूळ आणि पाण्याचा कुठलाही परिणाम होत नाही. या सायकलची किंमत 38,999 रुपये आहे.

Hero Lectro F1 ही सायकल Hero Lectro श्रेणीतील सर्वात ताज्या दमाचे उत्पादन आहे. ही सायकल सर्व प्रकारचे रस्ते, ट्रॅक्सला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही सायकल प्रति तास 25 किलोमीटर स्पीडने धावते. तिला डिस्क ब्रेकही देण्यात आले आहे. या सायकलची किंमत 38,999 रुपये आहे.

Hero Lectro F6i हे या श्रेणीतील सर्वात टॉप मॉडेल आहे. यामध्ये 11.6 Ah क्षमतेची बॅटरी आहे. एकदा फुल चार्ज झाल्यास ही सायकल 55 किलोमीटर पर्यंत धावते. यामध्ये LED डिस्प्ले ही मिळतो. या सायकलची किंमत जास्त आहे. ही सायकल 54,999 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.