Kisan Scheme : ही सरकारी योजना डबल करेल पैसा! करा अशी गुंतवणूक

Kisan Scheme : या सरकारी योजनेत तुमचा पैसा डबल होईल. या योजनेला सरकारकडून हमी मिळते. त्यामुळे पैसा बुडण्याची भीती नसते. तसेच व्याजदर चांगला असल्याने परतावा पण चांगला मिळाला.

Kisan Scheme : ही सरकारी योजना डबल करेल पैसा! करा अशी गुंतवणूक
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 7:15 PM

नवी दिल्ली : टपाल खात्यातील अल्पबचत योजना (Post Office Small Savings Scheme) लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यामुळे नागरिकांना बचतीची सवय लागली आहे. पोस्ट खात्यातील अल्पबचत योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सुरक्षित परताव्यासाठी (Return) टपाल खात्याच्या योजनेत गुंतवणूक फायद्याची ठरेल. टपाल खात्यातंर्गत मुदत ठेव योजना, मासिक बचत, जेष्ट नागरिक बचत, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला फायदा होईल. या योजनेत पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र (Kisan Vikas patra) योजनेत जोरदार परतावा मिळतो.

सरकारची हमी देशात पोस्ट ऑफिसचे जाळे मजबूत आहे. किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी टपाल कार्यालयात खाते उघडावे लागेल. पोस्ट खात्यातील योजनांमध्ये पैसा बुडण्याची भीती नसते. या योजनांना केंद्र सरकारचे संरक्षण आहे. सरकार या योजनेची हमी घेते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत वार्षिक 7.5 टक्के व्याजदर आहे. या योजनेत तुम्ही 115 महिन्यात गुंतवणूक दुप्पट करु शकता.

1000 रुपयांपासून गुंतवणूक किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकते. या योजनेत 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

कोणाला उघडते येते खाते या योजनेत एक आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत अल्पवयीन अथवा भोळसर व्यक्तीच्या नावेही पालकाला खाते उघडता येते. या योजनेत खाते हस्तांतर करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अथवा सह खातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत करता येते.

योजनेचा कालावधी या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

मॅच्युरिटीपूर्वी करता येते खाते बंद किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करता येते. त्यासाठी काही अटी घालण्यात येतात. एकच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद करता येते.

अशी करा गुंतवणूक

  • टपाल खात्याच्या किसान विकास पत्र (KVP) अर्ज, फॉर्म-ए प्राप्त करा
  • आवश्यक माहिती, तपशील भरुन हा अर्ज जमा करा
  • एजंटच्या मदतीने फॉर्म भरता येईल
  • केवायएसी प्रक्रियेसाठी आवश्यक दस्तावेजांची एक कॉपी तयार ठेवा
  • पडताळणी आणि रक्कम जमा केल्यानंतर केव्हीपी प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येते

फायदे काय

  • गरजेच्या वेळी तुम्हाला पैशांची गरज असते, त्यावेळी या योजनेतून तुम्हाला पैसे काढता येतात
  • किसान विकास पत्र बँकेत तारण ठेऊन कर्ज घेता येते
  • या गुंतवणुकीवर आता आयकर सवलत मिळत नाही
  • उत्पन्नानुसार तुम्हाला कर भरावा लागू शकतो

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.