Post office Scheme : गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त प्लॅन, एफडीपेक्षाही मिळवा रिटर्न तगडा

Post office Scheme : चांगल्या परताव्यासाठी अनेक योजना बाजारात आहे. बँका, पोस्ट कार्यालयात तुम्हाला या योजना मिळतील. पण जोरदार परतावा कोणत्या योजनेत मिळतो?

Post office Scheme : गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त प्लॅन, एफडीपेक्षाही मिळवा रिटर्न तगडा
मिळवा फायदा
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली : या नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा (Investment Scheme) विचार करु शकता. जोखीम नसलेल्या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याची अजिबात भीती नसते. तसेच सध्याच्या बाजारभावानुसार व्याज दर (Interest Rate) ही चांगला असल्याने तुम्हाला या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या योजना (Post Office Scheme) गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. त्यातून तुम्हाला जोरदार परतावा ही मिळतो. तसेच नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठी रक्कम हाती येते. तसेच रक्कम बुडण्याची भीतीही नसते.

पोस्ट खात्याती टाईम डिपॉझिट योजना लोकप्रिय आहे. ही अल्पबचत योजना आहे. ही योजना पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देते. सध्या या योजनेवर 6.7% हमखास परतावा मिळतो. या योजनेचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण करण्यात येऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळासाठी ही योजना बचतीचा पर्याय ठरु शकते.

मासिक बचत योजनामधील गुंतवणुकीवर आता अधिक व्याज मिळते. पूर्वी 6.7% व्याज मिळते. आता हे व्याज वाढून 7.1% झाले आहे. या योजनेत तुम्ही एकदा रक्कम गुंतवणूक करुन दर महिन्याला चांगला परतावा मिळू शकता. ही योजना पुर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेवर बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही. MIS खात्यात केवळ एकदाच गुंतवणूक करावी लागते. या योजनेची मॅच्युरिटी पाच वर्षांची आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) ही गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. या योजनेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 6.8% व्याजदर 7.0% करण्यात आला आहे. एनएससीमध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते.तर कमाल गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा नाही.

एनएससी योजनेत तुम्ही किती ही मोठी गुंतवणूक करु शकता. त्याला मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला दीर्घकालावधीसाठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. ही योजना पाच वर्षांत मॅच्युर होते. वार्षिक आधारावर योजनेत व्याज मिळते. कम्पाउंडिंग व्याजाचा फायदा मिळतो. तसेच हमखास परतावा मिळतो.

यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेत (SCSS) रक्कम जमा करण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. त्यामुळे आता या योजनेत जवळपास 30 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्त बचतीवर लाभ मिळेल. तर मासिक बचत योजनेत 9 लाख रुपयांपर्यंतची बचत करता येईल. वृद्धपकाळासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोटी गुंतवणूक करता येईल. त्याचा त्यांना फायदा होईल.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.