Post Office Scheme : या योजनेत गुंतवा पैसे, मिळेल डबल रिटर्न !

Post Office Scheme : टपाल खात्याच्या या योजनेत तुम्हाला डबल रिटर्न मिळेल. टपाल खात्याच्या अनेक योजना लोकप्रिय आहेत, त्यातीलच ही एक योजना आहे. गुंतवणूकदारांना ही योजना दुप्पट परतावा देते. कोणती ही योजना?

Post Office Scheme : या योजनेत गुंतवा पैसे, मिळेल डबल रिटर्न !
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 9:43 PM

नवी दिल्ली : जोखीम मुक्त योजनेत रक्कम दुप्पट होत असेल तर यासारखे सूख नाही. कारण तुम्हाला गुंतवणुकीचा सातत्याने आढावा घेण्याची गरज नसते. अर्थात गुंतवणूक आणि बचत (Saving Scheme) या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. बचतीत तुम्हाला एका निश्चित काळासाठी रक्कम गुंतवावी लागते. त्यावर व्याजदर निश्चित असतो. एका ठराविक कालावधीनंतर या योजनांमध्ये फायदा मिळतो. टपाल खात्याच्या अनेक योजना (Post Office Scheme) जनसामान्यांत लोकप्रिय आहेत. परंपरागतच नाही तर शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांनाही या योजनेची भुरळ पडली आहे. टपाल खात्याच्या या योजनेत अवघ्या 123 महिन्यांत रक्कम डबल होते. व्याजदारच्या (Interest Rate) बळावर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळतो.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने टपाल खात्याच्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत व्याज दर 1.10% पर्यंत वाढविण्यात आला आहे. किसान विकास पत्राच्या (Kisan Vikas Patra – KVP) व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. व्याज दरांच्या वृद्धीनंतर किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूकदारांची रक्कम आता 3 महिन्यांअगोदरच दुप्पट होते. या योजनेत गुंतवणूक वाढली आहे.

1 जानेवारी 2023 रोजीनंतर किसान विकास पत्रात आता तुमचा पैसा 123 महिन्यांऐवजी 120 महिन्यातच डबल होतो. म्हणजेच आता पूर्वीपेक्षा गुंतवणूकदारांचे तीन महिने वाचणार आहेत. त्यांना आता डबल परतावा तीन महिन्यांअगोदरच मिळेल. केव्हीपीवर त्यांना सध्या 7.20% व्याज मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

या योजनेत तुम्ही केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतेही मर्यादा नाही. या योजनेतंर्गत तुम्ही किती खाते उघडू शकता. योजनेत तुम्ही एकल अथवा 3 वृद्ध व्यक्ती मिळून संमिश्र खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही कोणाला ही वारस नेमू शकता.

या योजनेत पालक अल्पवयीन, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.तसेच या योजनेत खाते हस्तांतर करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अथवा सह खातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत करता येते. या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.