LIC IPO update: एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी; विमाधारक, कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद

देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे. आतापर्यंत या आयपीओला विमाधारक आणि कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळत आहे.

LIC IPO update: एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी; विमाधारक, कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद
Image Credit source: LIC India
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 7:25 AM

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये (LIC IPO)  गुंतवणूक (Investment) करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. चार मे रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. काल रविवार असून देखील गुंतवणूकदारांना एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी बाँका सुरूच ठेवण्यात आल्या होत्या. शेअर बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार रविवारी संध्याकाळी सातपर्यंत या आयोपीओला 16,20,78,067 शेअर्ससाठी एकूण त 29,08,27,860 बोली प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे ही गुंतवणूक आता 1.79 पटीने वाढली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असून, या आयपीओची किंमत 21 हजार कोटी रुपये एवढी आहे. दरम्यान चार मे रोजी एलआयसीचा आयोपीओ गुंतवणूकीसाठी खुला होताच या आयपीओला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला तो म्हणजे विमाधारक आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा. एलआयसीचे कर्मचारी आणि विमाधारकांना गुंतवणुकीसाठी सूट देण्यात आल्याने या आयपीओला त्यांचा चांगाल प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे.

पात्र संस्थागत गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद

मिळत असलेल्या माहितीनुसार पात्र संस्थागत गुंतवणूकदार श्रेणीमध्ये अद्यापही पूर्ण सब्सक्रिप्शन होऊ शकलेलं नाही. पात्र संस्थागत गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असलेल्या केवळ 0.67 टक्केच समभागांनाच बोली लागली आहे. तर दुसरीकडे गैर संस्थागत गुंतवणूकदार श्रेणीमध्ये आतापर्यंत 2,96,48,427 शेअर्ससाठी एकूण 3,67,73,040 बोली लागली आहे. गैर संस्थागत गुंतवणूकदारांचे सब्सक्रिप्शन हे 1.24 पटीने वाढले आहे. या आयपीओला सर्वाधिक प्रतिसाद हा विमाधारक तसेच एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.

विमाधारकांना 60 रुपयांचा डिस्काउंट

एलआयसीच्या आयपीओमध्ये प्रति शेअर्ससाठी 902-949 रुपयांचे मुल्य निश्चित करण्यात आले होते. एका खंडामध्ये 14 शेअर्सचा समावेश करण्यात आला होता. म्हणजेच तुम्हाला जर एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमितकमी 14 शेअर्सची खरेदी आवश्यक आहे. यामध्ये जे एलआयसीचे विमाधारक आहेत त्यांना प्रति शेअर्समागे 60 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर जे एलआयसीचे कर्मचारी आहेत त्यांनी प्रति शेअर्समागे 45 रुपयांची सूट देण्यात आली आहे. एलआयसीची 3.5 टक्के भागिदारी विकून 21,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे सरकारने लक्ष्य आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...