Today Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या नव्या किमती जारी करण्यात आल्या आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंधनाच्या किमती स्थिर आहेत. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. मात्र भारतात इंधनाच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Rate) 105.41 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपए प्रति लीटर इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price Today) प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये आहे. एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि अन्य इंधनाच्या दरात गेल्या महिनाभरात वाढ झाली आहे. मात्र गेल्या सहा एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये आहे. तर डिझेलचा रेट 105.41 रुपये लिटर आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा रेट प्रति लिटर 120.40 तर डिझेलचा भाव 103.73 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये आहे, तर डिझेलचा भाव 104. 50 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.20 रुपये असून डिझेलचा भाव 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किमती कधीपासून स्थिर?
22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षाही अधिक महागले. मात्र सहा एप्रिलनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरात तेजी असताना देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र येत्या काळात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या भावात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तान, श्रीलंका आणि चीनमध्ये पेट्रोल स्वस्त
बँक ऑफ बडोदाकडून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, भारतामध्ये हॉगंकॉंग, जर्मनी आणि ब्रिटनच्या तुलनेत पेट्रोल स्वस्त आहे. मात्र चीन, ब्राझील, जपान, अमेरिका, रशिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या तुलनेत देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती महाग आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती या प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या दरावर निर्धारीत केल्या जातात.