मुंबई : आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil prices) घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर 124 डॉलर प्रति बॅरलवरून 115 डॉलर प्रति बॅरल इतके स्वस्त झाले आहेत. मात्र याचा कोणताही परिणाम देशातील इंधनाच्या किमतीवर झाला नसून, आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol, diesel rate) स्थिर आहेत. इंधनाच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.62 रुपये एवढे आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल, डिझेलचे भाव (diesel rate) अनुक्रमे 111.35 आणि 97.28 रुपये एवढे आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 तर डिझेलचार दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भावात केणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111. 30 तर डिझेलचा रेट प्रति लिटर 98 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 111.02 आणि 95.54 रुपये एवढा आहे.
शहरं | पेट्रोल | डिझेल |
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
कच्च्या तेलाच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज
आज अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर 124 डॉलर प्रति बॅरलवरून 115 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. मात्र येणाऱ्या काळात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया -युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपातील काही राष्ट्रांनी रशियाकडून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलावरील बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच दर आणखी वाढल्यास भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.