मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (gold prices) घसरण सुरू होती. अखेर आज सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला असून, सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 46,750 वर पोहोचला आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,200 रुपये इतके होते. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात प्रति तोळा 450 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरट सोन्याचा दर देखील वधारले असून, 24 कॅरट सोन्याचे आजचे दर प्रति तोळा 51,490 रुपये इतके आहेत. बुधवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,000 रुपये होते. याचाच आर्थ आज 24 कॅरट (24 carats) सोन्याच्या दरामध्ये देखील 490 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यामध्ये आज तेजी दिसत असल्याने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सराफा मार्केट सुरू होताच सकाळी व दुसऱ्यांदा सायंकाळच्या सुमारास. तसेच सोन्याचे दर हे सोने अधिक दागिन्याच्या घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्याने सोन्याचे भाव सातत्याने बदलत असतात.
आज सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला असून, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,200 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,490 रुपये आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,300 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा भाव 51,590 रुपये इतका आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,300 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,590 इतका आहे. नाशिकमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 47,200 आणि 51,490 इतका आहे. तर आज चांदीचे दर प्रति किलो 60,400 रुपये इतके आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरू असल्याने सोने खरेदी वाढली आहे. सोन्यामधील गुंतवणूक वाढत असल्याचे समोर आले आहे. सध्या भारतात लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. त्याची देखील सोने खरेदीला मोठी मदत होते. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते. याच काळात इतर वेळेच्या तुलनेत सराफा व्यापार तेजीत असल्याचे दिसून येते. आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोन्याचे दर स्वस्त झाले आहेत. मात्र आता हळहळून सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे.