मुंबई : आज सोन्याचे दर (gold prices) स्थिर असून, चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,750 रुपये इतके आहेत. शुक्रवारी देखील 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 47,750 रुपये इतकाच होता. आज 22 कॅरट सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नसून दर स्थिर आहेत. आज 24 कॅरट सोन्याचे दर देखील स्थिर आहेत. आज 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,090 इतका आहे. शुक्रवारी देखील सराफा मार्केट बंद होताना 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,090 इतकाच होता. मात्र आज दुसरीकडे चांदीच्या दरात (silver prices) किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो 62,150 रुपये इतका होता. शनिवारी आज चांदीचा दर प्रति किलो 62,200 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे आज चांदीच्या दरात प्रति किलो मागे 50 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर दिवसांतून दोनदा जाहीर होतात. एक म्हणजे सराफा मार्केट सुरू होताच सोन्याचे दर जारी केले जातात. तर दुसऱ्यांदा सांयकाळच्या वेळी सोन्याचे दर जारी केले जातात त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.
आज सोन्याचे दर स्थिर आहेत. सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात पन्नास रुपयांची किरकोळ दरवाढ झाली आहे. आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,850 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,190 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,850 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,190 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,850 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,190 रुपये इतका आहे.
आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. भारतातील सर्वाधिक सोन्याचा दर हा चेन्नईमध्ये आहे, चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,150 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. तर आज चांदीचा दर प्रति किलो 62,200 रुपये इतका आहे.