नवी दिल्ली : केद्र सरकारकडून पेट्रोल (petrol), डिझेलवरील (diesel) एक्साईज ड्युटीमध्ये (Excise duty) कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णायानंतर आज प्रथमच पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे दर जारी करण्यात आले. नव्या दरानुसार आज भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून, डिझेलच्या दरात कपात होऊन डिझेलचे भाव प्रति लिटर 89.62 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 113.35 आणि 97.28 रुपये इतका आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात पेट्रोल प्रति लिटर 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
देशात महागाईचा भडका उडाला आहे. गेल्या काही दिवसांत महागाई मागील 9 वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे सामन्य नागरिक हवालदिल झाले होते. इंधनापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींचे दर झपाट्याने वाढत असल्यामुळे महागाईला तोंड कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
केद्रांने एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.35 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये असून, डिझेलचा दर 95.92 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलाच दर प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.44 इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.03 रुपये तर डिझेलचा दर 98.95 इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.83 रुपये इतका आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.29 रुपये इतका आहे.
शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. यापूर्वी चार नोव्हेंबर 2021 रोजी देखील केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केला होता. तेव्हापासून राज्य सरकारने देखील पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी व्हॅट कमी करावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. आता दुसऱ्यांदा केंद्राकडून कर कमी करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकार इंधनावरील व्हॅट कधी कमी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.