Today’s petrol, diesel rates : व्हॅट कपातीनंतर राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
राज्य सरकारने काल पेट्रोल, डिझेलच्या व्हॅट कपातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या व्हॅटमध्ये प्रति लिटर मागे 2 रुपये 8 पैसे तर डिझेलच्या व्हॅटमध्ये 1 रुपया 44 पैशांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाले आहे.
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी केंद्राने एक्साइज ड्युटीमध्ये कपात (Excise duty cut on Petrol and Diesel) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पेट्रोलच्या (Petrol) एक्साइज ड्यूटीमध्ये प्रति लिटर आठ रुपयांची तर डिझेलच्या एक्साइज ड्यूटीमध्ये सहा रुपयांची कपात करण्यात आली. एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आल्याने रविवारी पेट्रोल प्रति लिटर मागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान केंद्राने एक्साइज ड्यूटीमध्ये कपात केल्यानंतर ओडिशा केरळ, राजस्थान या राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात केली आहे. या राज्यानंतर रविवारी महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील व्हॅट कपातीची घोषणा करण्यात आली. केंद्राने कमी केलेली एक्साइज ड्यूटी आणि राज्यांकडून करण्यात आलेली व्हॅट कपात यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात आले आहेत. महाराष्ट्रात व्हॅट कपात केल्यानंतर आज पेट्रोलियम कंपन्यांकडून प्रथमच इंधनाचे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत.
प्रमुख महागनगरातील पेट्रोलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109.27 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.84 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये लिटर आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
केंद्रापाठोपाठ राज्याने देखील पेट्रोल, डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली आहे. व्हॅट कपात करण्यात आल्यानंतर आज पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त झाले आहे. नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.84 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.35 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.48 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.87 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.51 रुपये इतका आहे.