Indian Railway : रेल्वेचे इंजिन का नाही करत बंद, काय आहे या धडधडण्यामागची धडपड

Indian Railway : भारतीय रेल्वेशी संबंधित काही रोचक बाबी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील. या गोष्टी तुमच्या गावीही नसतील. कधी तरी प्रश्न पडला तर त्याचे उत्तर ही तुम्ही शोधले नसेल. तर रेल्वेच्या इंजिनाविषयीच्या या प्रश्नाचे उत्तर काय असेल? रेल्वेचे इंजिन का बरं बंद करत नसतील?

Indian Railway : रेल्वेचे इंजिन का नाही करत बंद, काय आहे या धडधडण्यामागची धडपड
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 9:37 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही ट्रेनने प्रवास (Train Journey) करत असाल तर ही रोचक माहिती जरुर वाचा. तुम्ही रेल्वेने प्रवास करताना एक गोष्ट लक्षात घेतली का? कोणत्याही रेल्वे स्थानकावर कितीही वेळ रेल्वे थांबली तरी त्या रेल्वेचे इंजिन (Railway Engine) कधीच बंद करण्यात येत नाही. काही ठिकाणी दुसऱ्या रेल्वेला, फास्ट रेल्वेला जाण्यासाठी पास देण्यात येतो. त्यावेळीही रेल्वे अर्धा वा अधिक वेळ उभी असते. त्यावेळीही रेल्वेचे इंजिन धडधडतच असते. ते बंद करण्यात येत नाही. जर काही तांत्रिक बिघाड झाला तरच रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येते. अनेकांना प्रश्न पडतो की रेल्वेचे इंजिन का बंद करण्यात येत नसेल, कारण त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. डिझेलचा (Diesel Price) आजचा भाव बघितल्यास खूप मोठा खर्च येतो. तरीही रेल्वे इंजिन प्रत्येक ठिकाणी बंद करण्यात का येत नसेल?

पण इंजिन बंद न करण्यामागचे कारण तरी काय आहे? एखाद्या रेल्वे स्टेशनवर सर्व प्रवासी उतरतात, तरीही त्याठिकाणी रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येत नाही. एखाद्या सुपरफास्ट ट्रेनला पास देण्यासाठी काही ठिकाणी रेल्वे बऱ्याच वेळ थांबते, त्यावेळीही इंजिन बंद करण्यात येत नाही. यामागे डिझेलचे इंजिन ही खरी समस्या आहे. डिझेल इंजिन बंद केल्यास लोको पायलट आणि प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो.

डिझेल इंजिनची तांत्रिक बाजू किचकट असते. या किचकटपणामुळे लोको पायलट ते बंद करण्याऐवजी ते सुरुच ठेवतात. त्यामुळे पुन्हा डिझेल इंजिन सुरु करण्याच्या कटकटीतून वाचता येते. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर थांबते, त्यावेळी रेल्वेच्या इंजिन ब्रेक दबाव सहन करु शकत नाही.

हे सुद्धा वाचा

ट्रेन थांबल्यानंतर शिटीसारखा एक आवाज येतो. हा रेल्वेवरील वाढलेला दबाव कमी करण्याचा इशारा आहे. दबाव तयार करण्यासाठी रेल्वेला मोठा वेळ लागतो. पण जर लोको पायलटने इंजिन बंद केले तर दबाव तयार करण्यासाठी अजून मोठा वेळ लागेल. इंजिन बंद करुन केवळ स्टार्ट करण्यासाठी जवळपास 20 मिनिट लागतात. त्यामुळेच रेल्वे इंजिन बंद करण्याची घाई करण्यात येत नाही.

एवढेच नाही तर हे कारण तर सर्वात घातक ठरते. त्यामुळे लोको पायलट रेल्वे इंजिन बंद करण्याची ही जोखीम कधीच घेत नाही. रेल्वे इंजिन बंद केल्यास लोकोमोटिव्ह इंजिन बिघडण्याची मोठी शक्यता असते. डिझेल इंजिनला एक बॅटरी असते. ही बॅटरी चार्ज झाली तर इंजिन चालू राहते आणि इंजिन चालू राहिले तर बॅटरी चार्ज होते.

सातत्याने रेल्वे इंजिन बंद केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. इकडे इंजिनावरही मोठा परिणाम होतो आणि इंजिन बसते. त्यात काही बिघाड झाल्यास पुन्हा डोक्याला ताप होतो. त्यामुळेच लोको पायलट रेल्वे इंजिन बंद करत नाही.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.