Travel Insurance : प्रवासाची हौस भारी, आता विमा पण दारी! ट्रॅव्हल इन्शुरन्सचा असा होईल फायदा

Travel Insurance : प्रवास विमा, तुमच्या पर्यटनासोबतच जोखीमेची हमी घेतो. तुमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होतो. जर तुम्हाला सातत्याने प्रवास करावा लागत असेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे.

Travel Insurance : प्रवासाची हौस भारी, आता विमा पण दारी! ट्रॅव्हल इन्शुरन्सचा असा होईल फायदा
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 6:53 PM

नवी दिल्ली : तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच. पर्यटन, प्रवास आणि आयुष्य जगण्याची, मौज करण्यासाठी काहींना प्रवास करणे आवडते. काही ना छंदच असतो. त्यांना देशच नाही तर जग पालथे घालायचे असेत. पण प्रवास आला म्हणजे जोखीम (Risk) आलीच. जीवाला धोका आलाच. प्रवासात वस्तू ,पासपोर्ट, हरविण्याची भीती आलीच. विमानाचे उड्डाण रद्द होणे, विमान उड्डाणास उशीर होणे, या समस्यांचा सामाना करावा लागतो. पण या सर्वांचाच विमा काढून मिळाला तर! जर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) खरेदी केला तर तुम्हाला संरक्षण मिळते. तुम्हाला प्रवाशी विमा खरेदी करायचा असेल तर त्यासंबंधीची माहिती असणे आवश्यक आहे.

Premium कसा ठरवता येतो

तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सचा प्रीमियम, तुम्ही कोणता प्लॅन खरेदी करता, त्याआधारे ठरतो. तुमची सहल किती दिवसांची आहे. किती दिवस तुम्ही प्रवास करणार आहात. सिंगल ट्रिप प्लॅन, मल्टी ट्रिप प्लॅन, विद्यार्थ्यांची योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, याआधारे हप्ता निश्चित होतो. याशिवाय तुमच्या सुट्यांच्या हिशोबाने तुमच्या प्रवाशी विम्याचा हप्ता निश्चित होतो. तुम्हाला सोयी-सुविधा हव्या असतील तर त्याआधारे अतिरिक्त रक्कम देऊन विम्याचे संरक्षण वाढवता येते.

हे सुद्धा वाचा

पर्यटन विमा, प्रवास विम्याचे वैशिष्ट्ये म्हणजे, तुम्ही कुटुंबियांसह प्रवासाला निघालात. तुमच्या घराची काळजी कोण घेईल. अशावेळी तुम्हाला या योजनेतच होम इन्शुरन्स जोडता येतो. महागड्या वस्तू आणि इतर गोष्टींसाठी ॲड ऑनची सुविधा मिळते. पण त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. या सर्व प्रकारात विम्याची रक्कम वाढेल. पण त्याचा फायदा ही होईल.

यासाठी नाही मिळत विमा

ट्रॅव्हल विमा पॉलिसीत सध्याचा आजार, युद्ध, लढाई, आत्महत्या, दंगल, स्थानिक अचानक उसळलेली परिस्थिती यामुळे काही नुकसान झाले तर त्याचा विम्यात समावेश होत नाही. विमा कंपन्या तुम्हाला त्याची नुकसान भरपाई देत नाहीत. त्यासाठी ॲड ऑनची मदत मिळते. पण यासंबंधी विमा प्रतिनिधी, विमा कंपनी यांच्याकडून स्पष्ट माहिती घ्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

  1. जर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करत असाल तर या योजनेत काय काय कव्हर झाले ते तपासा
  2. देशातील पर्यटन स्थळे, अभयारण्य अथवा इतर ठिकाणी फिरताना विम्यातील तरतूदींचा विचार करा
  3. परदेशी प्रवासादरम्यान विमान, पासपोर्ट, परदेशातील दुर्घटना, चोरी यासंबंधीच्या तरतूदी एकदा तपासाच
  4. विमा एजंट, अधिकारी, कंपनीकडे तुमच्या शंका विचारा, त्यासंबंधीचे त्यांचे उत्तर कागदावर उतरतात का ते पाहा
  5. सर्वात महत्वाचे म्हणजे अटी आणि शर्तींचे बारकाईने वाचन करा. त्यात काही न आवडणाऱ्या बाबी विचारा
  6. दोन विमा कंपन्यांचे प्लॅन, शुल्क, ॲड ऑनची सुविधा व इतर बाबींची माहिती घ्या

sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड
sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड.
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा.
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.