Bank Fraud : ऑनलाईन फसवणूकीच्या जामतारा पॅटर्नचा नाही बसणार फटका, केंद्र सरकार उचलणार हे मोठे पाऊल..

Bank Fraud : ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. .

Bank Fraud : ऑनलाईन फसवणूकीच्या जामतारा पॅटर्नचा नाही बसणार फटका, केंद्र सरकार उचलणार हे मोठे पाऊल..
आता फसवणूक टळणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 6:23 PM

नवी दिल्ली : मोबाईलवर कॉल (Call) करुन फसवणुकीच्या घटना आता सामान्या झाल्या आहेत. नेटफ्लिक्सची सीरीज जामताराने (Jamtara) फसवणूक कशी करण्यात येते, याची चुणूक दाखवली. पण आता प्रत्यके शहरात, गावात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येतातच. खासकरुन ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) या जाळ्यात ओढण्यात येते. कॉल कोण करत आहे, याची माहिती नसल्याने बऱ्याचदा फसवणूक होते. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात येते.

आता सर्वसामान्य नागरिकांची आता या फसवणुकीपासून लवकरच सूटका होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) यासाठी कंबर कसली आहे. ट्रायने मोबाईल क्रमांकासोबत नावाचा कॉलर आयडी आणण्याची व्यवस्था केली आहे.

यामुळे तुम्हाला समोरुन नवीन मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला तर, मोबाईल क्रमांकासोबतच त्या व्यक्तीचे नावही दिसेल.  वारंवार त्रास देणाऱ्या आणि कंपन्यांच्या कॉलची माहिती ग्राहकांना मिळेल.  त्यामुळे हे कॉल उचलण्यात येणार नाही. अथवा त्यांची माहिती समोर येईल.

हे सुद्धा वाचा

नाव जाहीर करण्याच्या या व्यवस्थेसंदर्भात ट्रायने नागरिकांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ट्रायने मंगळवारी याविषयीची माहिती दिली. नेटवर्कमध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दर्शविणारी व्यवस्था (CNAP) लागू करण्यासंबंधी ट्रायने एक पत्र जारी केले आहे.

त्यानुसार, संबंधितांकडून या नवीन व्यवस्थेविषयी 27 डिसेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. या सूचनांवर, हरकतींवर 10 जानेवारी 2023 रोजी पर्यंत उत्तर देण्यात येणार आहे. त्यानंतर हा व्यवस्थेविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

भारतात आतापर्यंत ट्रुकॉलर आणि इतर मोबाईल अॅपच्या मदतीने मोबाईल वापरकर्त्यांना कॉल करणाऱ्यांची ओळख पटविता येत होती. पण या अॅपवरील माहिती  पूर्णपणे विश्वसनीय स्त्रोत नसल्याने एक उणीव भासत होती. त्यासाठी केंद्र सरकार व्यवस्था करणार आहे.

ट्रायच्या माहितीनुसार, ही व्यवस्था केवायसीवर आधारीत असेल. नवीन सिम कार्ड खरेदी करताना टेलिकॉम कंपन्यांना आधार कार्ड अथवा पॅन कार्डचे सत्यापन करणे आवश्यक असते. नवीन व्यवस्थेत नवीन मोबाईल क्रमांकासोबतच्या कॉलर आयडीला आधारचा तपशील जोडण्यात येणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.